दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न; नितेश राणेंच मोठं वक्तव्य

दंगली घडवून सत्तेत येण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न; नितेश राणेंच मोठं वक्तव्य

Uddhav Thackeray’s attempt to come to power by creating riots in the state; Nitesh Rane : गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात विविध ठिकाणी दंगलीच्या (riot) घटना घडतांना पहायला मिळत आहेत. छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Naga) येथून सुरू झालेले दंगलीचे लोण आता हळूहळू राज्यभर पसरत आहे. दरम्यान, अकोल्यात शनिवारी दोन गटात झालेल्या वादानंतर रविवारी शेवगावमध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूकीत दगडफेक झाली. त्यावरून ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी भाजपवर आरोप केला होता. त्यांनी केलेल्या आरोपाला आता भाजपचे आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी जोरदार पलटवार करत उध्दव ठाकरेंवर निशाणा साधला. सध्या राज्यात ज्या काही दंगली होत आहेत, त्या दंगलीचा मास्टरमाईंड हे उद्धव ठाकरे आहेत, असं राणे म्हणाले.

नितेश राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत सांगतिकले की, कालच राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, दंगलीमागील सूत्रधार शोधा. मी अजित पवारांना सांगेन की या ज्या दंगली होत आहेत, त्याचा मास्टरमाईंड काही दिवसांपूर्वी तुमच्या सिल्व्हर ओकमध्ये आला होता… शरद पवार साहेबांच्या शेजारी बसला होता. कलानगर त्याचा पत्ता…मी वारंवार सांगतोय, 2004 मध्ये दंगल घडवून मुख्यमंत्री होण्याची इच्छा या सुप्त डोक्यातून बाहेर पडली. ती इच्छा आणि स्वप्न अजूनही मेलेले नाही. दंगली घडवून मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न अजूनही जिवंत आहे. उद्धव ठाकरेंची नार्कोटेस्ट करा, हे मी पुन्हा पुन्हा सांगत आहे. कारण 1993 च्या दंगलीनंतर 1995 मध्ये भाजप-शिवसेनेची सत्ता आली, असं सांगणारे उद्धव ठाकरे 2004 मध्ये तसाच प्रयत्न करत होते. 2004 मध्ये झालेल्या बैठकीला माजी सरचिटणीस अरुण बेतकेकर उपस्थित होते. ते याची पुष्टी देऊ शकतात. उद्धव ठाकरे हे या दंगलीचे सूत्रधार आहेत का? याची चौकशी झाली पाहिजे, असं राणे यांनी सांगितलं.

कर्नाटक निवडणुकीत भाजपची नाचक्की… 30 ठिकाणी डिपॉझिट जप्त

राणे म्हणाले की, ठाकरे गटातील अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे हे दोन नेते एकमेकांचं तोंडही पाहत नसतं. आता त्यांचे सूर मिळायला लागले आहेत. ते आज पुन्हा एकत्र येत आहेत. ही दंगलीची योजना आहे का? मुस्लिम समाजात दंगली घडवून मते वाढवण्याचा उद्धवजींचा डाव पुन्हा एकदा घडत आहे का? पवारसाहेबांनी हे ओळखावे, असं राणे म्हणाले. त्र्यंबकेश्वर मंदिरात जबरदस्तीने चादर फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते आग्रह करतात. महाराजांच्या गड किल्ल्यावर सर्वप्रथम अतिक्रमण सुरू केलं. आता धार्मिक स्थळ ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. उद्याही घरात देखील येतील, असं राणे म्हणाले.

कर्नाटकात पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या जात आहेत. काँग्रेसचे खरे मनसुबे उघड झाले आहेत. त्यांना महत्त्वाचे खाते देण्याची काँग्रेसची बांधिलकी आहे. असाच प्रयत्न त्यांच्या धार्मिक स्थळावर झाला असता तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देश पेटला असता. हिंदू एकसंध नाहीत हे त्यांना माहीत आहे. हिंदू समाज झोपला आहे. ही शोकांतिका असल्याचेही नितेश राणे यांनी म्हटले आहे.

आम्हाला हिंदू समाजाचा पाठिंबा मिळायला हवा. कर्नाटकात जिहादी सत्तेवर आले आहेत. राज्यातही तेच चित्र रंगले. त्याासाटी राजा अकादमी, ठाकरे गट आणि काँग्रेस नेत्यांच्या मुंबईत बैठक झाली. चादर चढवणे, छत्रपतींच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्याचे आदेश देणे हे पूर्व नियोजित केलेले केलेले षडयंत्र असल्याची टीका त्यांनी केली.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube