कर्नाटक निवडणुकीत भाजपची नाचक्की… 30 ठिकाणी डिपॉझिट जप्त

कर्नाटक निवडणुकीत भाजपची नाचक्की… 30 ठिकाणी डिपॉझिट जप्त

Constituency In Which BJP Lost Deposit : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा (Karnataka Assembly Election 2023) निकाल जाहीर झाला आहे. या निकालात काँग्रेसने (Congress) मुसंडी मारत स्पष्ट बहुमत मिळवलं. या निवडणुकीत 135 जागांसह काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला तर भाजपला 66 आणि जेडीएसला 19 जागांवर समाधान मानावं लागलं. या निवडणुकीत भाजपाची अक्षरशः नाचक्की झाली आहे. भाजपच्या एक दोन नव्हे तर तब्बल 30 उमेदवार आपलं डिपॉझिट देखील वाचवू शकलेले नाही.

WhatsApp Image 2023 05 16 At 1.15.46 PM (1)

कर्नाटक निवडणुकीसाठी भाजपने मोठी तयारी केली होती. अत्यंत प्रतिष्ठेची बनलेली या निवडणुकीसाठी भाजपचे केंद्रीय मंत्री देखील आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मैदानात उतरलेले होते. एकीकडे भारत जोडो यात्रेमुळे व नागरिकांच्या प्रमुख प्रश्नांना केंद्रीय स्थानी घेतल्याने काँग्रेसने या निवडणुकीत दणदणीत विजय मिळवला. व दुसरीकडे मोठं मोठ्या नेत्यांची फौज कर्नाटकात दाखल होऊनही भाजपला अपेक्षित यश कर्नाटकात मिळवता आले नाही.

Karnataka CM : सुशीलकुमार शिंदेंनी सोडवला कर्नाटकच्या CM पदाचा तिढा; सुचवले 2 मोठे पर्याय

भाजपने या निवडणुकीत 66 जागांवर विजय मिळवला आहे. मात्र या निवडणुकीत भाजपसाठी एक नाचक्कीची बाब समोर आली आहे. सध्या देशात सगळ्यात मोठा पक्ष अशी ओळख असलेल्या भाजपला कर्नाटकात अपेक्षित यश मिळवता आले नाही. धक्कादायक बाब म्हणजे कर्नाटक निवडणुकीत भाजपच्या 30 उमेदवारांचे अक्षरशः डिपॉझिट जप्त झालं आहे. यामुळे या निवडणुकीत भाजपाला मोठा धक्का बसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.

डिपॉझिट जप्त झालेले ठिकाण
कृष्णराजनगरा, होलेनरसीपूर, हुन्सूर, श्रावणबेळगोळा, श्रीनिवासपूर, अरसिकरे, मेलुकोटे, नागमंगला, पावगड, पिरियापटना, गौरीबिदानूर, मुलबागल, बांगरापेठ, रामनगरम, पुलकेशीनगर, सिडलघट्टा, गुरुमितकल, माघूगिरी मागडी, अर्कलगुड, कनकपुरा, चिंतामणी, बिदर, टी.नरसीपूर, मलावल्ली, चन्नगिरी, भद्रावती, कोरटागेरे, हगरीबोम्मनहल्ली, मद्दूर

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube