Karnataka CM : सुशीलकुमार शिंदेंनी सोडवला कर्नाटकच्या CM पदाचा तिढा; सुचवले 2 मोठे पर्याय

  • Written By: Published:
Karnataka CM : सुशीलकुमार शिंदेंनी सोडवला कर्नाटकच्या CM पदाचा तिढा; सुचवले 2 मोठे पर्याय

Once again Siddaramaiah will become Chief Minister. While DK Shivakumar will be given the post of Deputy Chief Minister, Home Minister and other important ministerial posts

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कर्नाटक काँग्रेसचे निरीक्षक सुशीलकुमार शिंदे (Sushilkumar Shinde) यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदावरुन (Karnataka CM) निर्माण झालेला तेढ सोडवला असल्याची माहिती आहे. शिंदे यांच्यासह इतर 2 निरीक्षकांनी कर्नाटकातील पक्षाच्या सर्व नवनिर्वाचित 135 आमदारांचे मत जाणून घेतले. त्यानंतर रविवारी (१४ मे) रात्री मुख्यमंत्र्यांच्या नावावर गुप्त मतदान झाले. आमदारांच्या ओपिनियन पोलनंतर सोमवारी 3 निरीक्षकांनी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्या निवासस्थानी जाऊन अहवाल आणि मतपेटी सादर केली.

काय आहे अहवालात?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बहुतांश आमदारांनी सिद्धरामय्या यांना आपली पसंती दर्शविली आहे. मात्र डीके शिवकुमार यांनाही दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचे म्हटले आहे. शिवकुमार यांनी प्रत्येक वेळी पक्षाला अडचणीतून बाहेर काढण्यासाठी काम केले आहे. एवढेच नव्हे तर, पक्षाने सोपवलेली प्रत्येक जाबाबदारी शिवकुमार यांनी प्रामाणिकपणे पूर्ण केले आहे. त्यामुळे आता या अहवालाच्या आधारे खर्गे सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांच्याशी चर्चा करणार आहेत.

शिवकुमार यांच्या हातात सरकारच्या नाड्या :

काँग्रेसने कर्नाटकात सरकार स्थापनेचे 2 सुत्रं ठरवले आहेत. यात पहिला पर्याय म्हणजे सिद्धरामय्या यांच्या गळ्यात पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली जाईल. तर डीके शिवकुमार यांना उपमुख्यमंत्रीपद, गृहमंत्रीपद आणि इतर महत्वाची मंत्रीपद देण्यात येतील यासोबतच डीके शिवकुमार राज्यात पक्षाचेही नेतृत्व करतील. म्हणजेच ते प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षही असतील.

अडीच वर्षांचा फॉर्म्युला :

नवनिर्वाचित आमदारांमध्ये सिद्धरामय्या यांचा वरचष्मा आहे, पण निवडणूक विजयात शिवकुमार यांची भूमिका दुर्लक्षित करता येण्यासारखी नाही. अशा परिस्थितीत दोघांमध्ये सामंजस्य व्हावे यासाठी हायकमांड प्रयत्नशील आहे. त्यामुळेच या दोघांना प्रत्येकी अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्री करण्याचाही पर्याय सुचिवला असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र यात सिद्धरामय्या यांना पहिली संधी मिळेल, अशी अटकळ बांधली जात आहे. परंतु राजस्थानचा अनुभव पाहता शिवकुमार सध्या कोणताही धोका पत्करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube