Download App

Sanjay Raut : टीका केल्यावर ‘सुभेदार’ सुभेदारीवर चालले; मुक्काम बदलल्यानंतर राऊतांची शिंदेंवर टीका

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते. त्यावरून संजय राऊत आणि विरोधकांनी टीका केली होती. त्यानंतर हा मुक्काम बदलण्यात आला. त्यावर राऊतांनी पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे.

फायनलआधी टीम इंडिया संकटात? ‘हा’ खेळाडू तातडीने श्रीलंकेला रवाना

टिकेचा टिका घेतल्यावर सुभेदार सुभेदारीवर चालले…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याचा निर्णयच बदलला. त्यावर राऊत म्हणाले की, टिकेचा टिका घेतल्यावर सुभेदार सुभेदारीवर चाललेले आहे. तसेच सरकारच्या माध्यमातून पेमेंट झालं आहे. जिल्हाअधिकाऱ्यांचे अकाउंट चेक करा. छत्रपती संभाजीनगरमधील सगळी फायस्टार हॅाटेल ताब्यात घेतली. काल आलेल्या पर्यटकांना जागा मिळू शकली नाही. सगळ्याच्या बुकिंग जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केल्या. अशी टीका राऊत यांनी केली.

Jab We Met 2: ब्रेकअपनंतर करिना अन् शाहिद पुन्हा एकत्र?, अभिनेता म्हणाला..

काय आहे संपूर्ण प्रकरण?

छत्रपती संभाजीनगर येथे आज मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. यासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आली असून, नेते मंडळींसाठी थोड्या थोडक्या नव्हे तर तब्बल 140 रूम्स आलिशान हॉटेलमध्ये बुक करण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या अलिशान सुटमध्ये राहणार होते त्याचे भाडे 32 हजार रूपये असून या दौऱ्यासाठी प्रशासनाकडून ‘सुभेदारी’ थाट करण्यात आला होता.

याशिवाय मंत्री, सचिव आणि इतर अधिकाऱ्यांच्या दिमतीला 300 गाड्यांचा ताफा ठेवण्यात आला होता. राज्यातील नागरिक आणि शेतकरी दुष्काळाच्या संकटाला तोंड देत असताना एका बैठकीसाठी होत असलेला कोट्यावधींचा खर्च पाहून विरोधकांचा पारा चढला. त्यांनी सरकारवर तुफान टीका सुरू केली. मग, सरकारलाही आपलं कुठेतरी चुकतंय, जनतेचा रोषही वाढू शकतो याचा अंदाज आल्याने माघार घेतली. फाइव्ह स्टार हॉटेलात राहण्याचा निर्णयच बदलला.

Tags

follow us

वेब स्टोरीज