Sanjay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण आणि उपनेते राजन साळवी यांच्यावर झालेल्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, ते दोघेही ठाकरेंसोबत निष्ठेने राहत असल्याने त्यांच्या वरती दबाव निर्माण केला जात आहे. कारवायांच्या धमक्या येत आहेत. अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिले ते आज माध्यमांशी बोलत होते.
ठाकरेंची ‘महापत्रकार परिषद’ अन् भाजपचा जळफळाट; सूरज चव्हाणांना सुडबुद्धीने अटक : अंधारेंचे टीकास्त्र
राऊत म्हणाले की, सुरज चव्हाण हे पक्षाचे सचिव आणि राजन साळवी हे उपनेते आणि आमदार आहेत. ते दोघेही ठाकरेंसोबत निष्ठेने राहत असल्याने त्यांच्या वरती दबाव निर्माण केला जात आहे त्याचबरोबर रवींद्र वायकर यांच्यावर देखील अशाच प्रकारचा दबाव आणला जात आहे. तसेच त्यांना तुम्ही ठाकरेंना सोडून शिंदे गटात आले नाही तर तुमच्यावर एजन्सी मार्फत कारवाया केल्या जातील अशा धमक्या त्यांना येत आहेत. सूरज चव्हाण यांनी धमक्यांना न घाबरता चौकशीला सामोरे गेल्याने त्यांनाही अटक झाली आहे.
सई-सिद्धार्थच्या लव्हस्टोरीची जुगलबंदी; ‘श्रीदेवी प्रसन्न’चा नव्या गाण्याचा टीझर रिलीज
ठाकरे गटाचे नेते राजन साळवी (Rajan Salavi ) यांच्या रत्नागिरीतील निवासस्थानी एसीबीच्या पथकाने झाडाझडती केली आहे. आतापर्यंत राजन साळवे यांनी सहा वेळा अलिबागमधील एसीबीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजेरी लावली होती. तर अर्धा तासाहून जास्त वेळा पर्यंत साळवी यांच्या घरामध्येही झडती सुरू होती.
दरम्यान नुकतीच कोरोना काळातील कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी ईडीने आदित्य ठाकरेंच्या (Aaditya Thackeray) जवळचा सहकारी सूरज चव्हाण (Suraj Chavan) याला अटक केली आहे. कोरोना काळात गरिब मायग्रेन कामगारांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी महापालिकेकडून 52 कंपन्यांना कंत्राट देण्यात आलं होतं. सुरुवातीच्या 4 महिन्यात 4 कोटी खिचडीचे पॅकेट वाटप करण्यात आले पण यामध्ये घोटाळा झाल्याच आरोप करण्यात आला आहे.