Download App

Sanjay Raut : राहुल नार्वेकरांनी कायदा अन् घटनेशी द्रोह केला; आमदार अपात्रतेवरून राऊतांचा घणाघात

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut : शिवसेनेमध्ये बंड करून बाहेर पडलेल्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई होणार आहे. त्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने विधान सभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सोडला आहे. मात्र अद्याप देखील त्यावर काहीही निर्णय आलेला नाही. त्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांवर ते घटनेशी द्रोह करत असल्याची जोरदार टीका केली आहे.

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिला जरांगेंना शब्द

नार्वेकरांनी कायदा अन् घटनेशी द्रोह केला…

आमदारांच्या अपात्रतेवरील निर्णय 6 महिन्यांपूर्वीच यायला हवा होता. सुप्रीम कोर्टाने तसे स्पष्ट निर्देश दिले होते. तरी देखील विधान सभेच्या अध्यक्षांनी आणि एक फुल दोन हाफ सरकारने हा निर्णय घेण्यास टाळाटाळ केली. आता त्यांनी जाहीर केलं की, आम्ही निर्णय घेऊ. महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्या सरकार काम करतयं. त्याला कायदेशीर आधार नाही.

मी शिंदेंना सराटीत आणलचं; उपोषण मागे घेतल्यानंतरही जरांगेंचा जोश कायम

महाविकास आघाडीचं सरकार फुट पाडून सरकार पाडलं. त्यात आमदारांवर अपात्रतेची कारवाई ही घटनेतील तरतुदीनुसार होणे गरजेचे आहे. मात्र तरी देखील विधानसभेचे अध्यक्ष पक्ष बदलण्याचा ज्यांना अनुभाव आहे. पक्षांचतर ज्यांचा धर्म आहे. ते कायद्याचे जाणकार आहेत. तरी देखील ते आमदार अपात्रतेच्या निर्णयावर चाल ढखल करत आहेत. त्यामुळे त्यांनी कायद्याशी आणि घटनेशी द्रोह केला. असं मी मानतो.

गेल्या एकवर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये एक घटनाबाह्या सरकार बसलयं. तरी देखील विधानसभेचे अध्यक्ष सर्वोच्च न्यायालयाचे आदेश मानायला तयार नसतील, तर आज घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि घटनेवर काम करणारे राज्याचे सुपुत्र स्वर्गात अस्वस्थ झाले असतील. त्यामुळे घटनेची आणि कायद्याचं पालन करण्याची सुबुद्धी त्यांना मिळो अशी मी प्रार्थना करतो. अशी टीका यावेळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

Tags

follow us