Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिला जरांगेंना शब्द

Maratha Reservation : मराठ्यांना आरक्षण दिल्याशिवाय शांत बसणार नाही; मुख्यमंत्र्यांनी दिला जरांगेंना शब्द

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मागील 17 दिवसांपासून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) उपोषण करत आहेत. आज उपोषणचा सतरावा दिवस होता. आज सकाळीच मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde) यांनी आंतरवाली सराटी गावात येत मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. यानंतर दोघांची चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे पाटील यांनी ज्यूस पिऊन जरांगे पाटील यांनी आपले उपोषण मागे घेतले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आरक्षण देण्याचा जरांगेंना शब्द दिला.

मी शिंदेंना सराटीत आणलचं; उपोषण मागे घेतल्यानंतरही जरांगेंचा जोश कायम

काय म्हणाले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे?

मनोजला शुभेच्छा देतो. त्याचं अभिनंदनही करतो. कारण आमरण उपोषण करणं. ते जिद्द आणि चिकाटीने पुढे नेणे. त्याला जनतेचा प्रतिसाद मिळणं कमी वेळा घडलं. मात्र ज्याचा हेतू शुद्ध, प्रामाणिक असतो. त्याला जनता पाठिंबा देते. तसेच तुम्ही माझ्या हस्ते उपोषण सोडलं त्याबद्दल धन्यवाद. अशा शब्दांत मनोज जरांगेचं उपोषणावर भावना व्यक्त केल्या.

Manushi Chhillar: अभिनेत्री मानुषी छिल्लरने पटकावला ‘वुमन ऑफ सबस्टन्स’ अवॉर्ड

त्याचबरोबर यावेळी त्यांनी मराठा आरक्षणावरील कायदेशीर बाबींवर मत मांडत. शासनाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी देखील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यासाठी केलेला कायदा उच्च न्यायालयात टीकलं देखील होतं. मात्र सर्वोच्च न्यायालयात ते टीकलं नाही. मात्र आता आरक्षण देण्याची भूमिका सरकारची आहे. आरक्षण रद्द झालं त्यानंतर 3700 मुलांना नोकऱ्या देण्याचं धाडस सरकारने केलं. जे काही होईल त्याला तोंड देण्याची तयारी ठेऊन नोकऱ्या दिल्या. अन्य सुविधाही सरकारने समाजाला दिल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube