Sanjay Raut Press Conference : आगामी विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावरून महायुतीतील घटकपक्षांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत महायुतीतील जागावाटप लोकसभेतील ‘स्ट्राइक रेट‘ आणि निवडून येण्याची क्षमता या निकषावर होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. यावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून गद्दारी आणि लुटमारीच्या बाबतीत तुमचा स्ट्राईक रेट मोठा असल्याचा टोला राऊतांनी लगावला आहे.
हिंदू असणं म्हणजे काहीही घडलं तरी प्रत्येकाला; सरसंघचालक मोहन भागवतांचं मोठ विधान
बहीण योजनेवर टिप्पणी
आज सकाळी माध्यमांनी याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, यांचा कसला आलाय स्ट्राईक रेट. गद्दारी, लुटमारी, भ्रष्टाचार आणि खोटे बोलण्याच्या बाबतीत यांचा स्ट्राईक रेट मोठा आहे. कामाच्या बाबतीत यांचा स्ट्राईक रेट काय आहे? असा सवालही राऊत यांनी केला. तसंच, लाडकी बहीण योजनेचे राज्याचे मोठे ढोल वाजवले जात आहेत. पण काल पंतप्रधान नरेंद्र मोदी जमशेदपूरमध्ये होते. तिथे त्यांनी झारखंड सरकारने सुरू केलेल्या लाडकी बहीण योजनेवर टिप्पणी केली.
पंतप्रधानांनी यावर टीका करताना अशा योजना बोगस, भंपक आणि बिनकामाच्या असल्याचं म्हटलं. याचा अर्थ दुसऱ्या राज्यात कुणी लाडक्या बहिणीसाठी काम केलं करत ते बोगस, भंपक आणि फसवणूक. मग तोच न्याय महाराष्ट्रातही लावला पाहिजे. मिधेंचे सरकारही तेच करत आहे. हे डबल स्टँडर्डचे लोक आहेत, असा घणाघात राऊत यांनी केला.
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा पुन्हा प्रयत्न?, फ्लोरिडातील गोल्फ क्लबबाहेर गोळीबार
भूत बंगले होणार
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत एक बंगला देण्यात आल्याची चर्चा आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले की, फडणवीस जिकडे जातायंत तिकडे त्यांना बंगला अलॉट होतोय. त्यांचे आणि बंगल्यांचे काय रहस्य आहे कळत नाही. महाराष्ट्रात मंत्र्यांना, कॅबिनेट मंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना एकच बंगला मिळतो, पण इथे त्यांनी तीन-तीन बंगले घेतले आहेत. पण या बंगल्याचे भूत बंगले होणार असून निवडणुका हरल्यावर भूतासारखे फिरत रहावे लागणार आहे.