Sanjay Raut on Santosh Bangar : हिंगोलीतील कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी कळमनुरी बाजार समिती निवडणुकीत 17 पैकी 17 जागा निवडून आल्या नाही तर मिशा ठेवणार नाही, असे म्हटले होते. यासंदर्भात त्यांचा एक व्हिडीओही व्हायरल झाला होता. आता त्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
ते म्हणाले, शिवसेना जिथं लढत नव्हती तिथं शिवसेनेचे पॅनल मोठ्या ताकदीने निवडून आले. काही गद्दार आमदारांनी घोषणा केल्या होत्या की आम्ही हरलो तर मिशा काढू आता मिशा काढल्यात का बघा नाहीतर आम्ही इथून पाठवतो हजामत करायला, असा टोला राऊत यांनी लगावला.
Bchhu kadu : वज्रमूठ तुटणार! ‘सामंत-पवारांची भेट म्हणजे राजकीय भूकंपाचे संकेत’
त्यांचे चीनी डोळे, शस्त्रक्रिया करू
भाजपचे लोक सांगत होते लहानशा मैदानात लहानशी सभा. पहा किती विराट झाली ते. मुळातच यांचे डोळे चीनी डोळे आहेत. त्यांच्या खोबणीत चीनी बु्ब्बुळे आहेत म्हणून त्यांना सगळेच लहान दिसत आहे. विरोधक उद्याचे सत्ताधारी असतात हे त्यांनी विसरू नये.
जर कोणी सभेला लहान सभा म्हणत असेल तर त्यांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करावे लागेल. एखादे नेत्रचिकित्सा शिबीर त्यांच्यासाठी शिवसेनेतर्फे लावू आणि त्यांच्या डोळ्यांच्या मोफत शस्त्रक्रिया करू, अशी खोचक टीका त्यांनी केली.
Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला