Download App

मुंबईतील मतदान प्रक्रियेवरून राऊतांचा प्रहार! म्हणाले ‘हा’ भाजपचा शेवटचा डाव

मुंबईत संथ गतीने मतदान झाल्यामुळे खासदार संजय राऊत यांनी भाजपव टीका केली आहे. तसंच, मोदींच डिजीटर इंडिया फेल झाल्याचही ते म्हणाले.

Sanjay Raut : ईव्हीएम हॅक करता आले नाहीत कारण आम्ही यावेळी जागृक होतो. तसंच, पैसे वाटतानाही आम्ही पकडलं. मग काय करायचं असा प्रश्न पडल्याने भाजपकडून काही ठिकाणी मतदान प्रक्रिया संथ करण्यात आली, असा थेट आरोप संजय राऊत यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

 

भाजपचा डाव

अनेक मुंबईकरांनी भर उन्हात उभं राहूर मतदान केलं. तरी काही मुंबईकर या उन्हा रांगेत उभा होते. मात्र, ढिसाळ कारभारामुळे अनेक मतदार मतदान न करताच घरी परतले हे लोकसशाहीसाठी दुर्दैवी आहे असंही राऊत म्हणाले आहेत. दरम्यान, राऊत यांनी याला भाजपला जबाबदार धरलं आहे. मतदार कंटाळतील, रांगेतून निघून जातील असा डाव भाजपचा होता असा थेट घणाघात राऊतंनी केला आहे.

 

भाजपला भीती होती

आम्हाला जातीयवाद किंवा प्रांतीयवाद करायचा नाही. मात्र, ज्या शिवसेनेला भरघोस मतदान होऊ शकलं असतं तिथं ते होऊ शकलं नाही. अत्यंत संथ गतीने मतदान यंत्रणा सुरू होती. आमच्या मताचा टक्का वाढू शकतो अशी भीती भाजपला होती त्यामुळे त्यांनी अशा अडचणी निर्माण केल्या असा थेट प्रहार राऊतांनी केला आहे.

 

मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेलं

ही डिजिटल इंडिया आहे ना? याचा अर्थ मोदींचं डिजिटल इंडिया फेल गेलं. फेल करण्यात आलं. निवडणुका जिंकण्यासाठी शेवटपर्यंत अशा पद्धतीने यंत्रणा राबवली तरीही मतदारांवर फरक पडला नाही. लोकांनी रात्री आकरा वाजेपर्यंत मतदान केलं. आणि आमचा म्हणजे इंडिया आघाडीचाच विजय होणार आहे असा विश्वासही संजय राऊत यांनी व्यक्त केला.

follow us