Download App

भाजपकडून लोकशाही हायजॅक; निवडणूक आयोग झालं ताटाखालचं मांजर; राऊतांचा थेट घणाघात

ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on BJP : महाराष्ट्रच नाही तर देशभरात निवडणुकीत घोटाळा केला आहे. (Sanjay Raut) भाजपने लोकशाही हायजॅक केली आहे. त्यामुळे निवडणूक आयोगासारखी संस्था त्यांच्या ताटाखालची मांजर झाली आहे अशा शब्दांत शिवसेना ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी भाजपवर थेट घणाघात केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

देवेंद्र फडणवीस यांना माझं आवाहन आहे की बीडचं;संजय राऊत यांचा देशमुख हत्येवरून घणाघात

काय म्हणाले संजय राऊत?

सगळं जग हे सांगतं आहे की ईव्हीएम घोटाळा आहे. जर निवडणूक आयोग हे म्हणत असेल की ईव्हीएममध्ये घोटाळा नाही तर निवडणूक आयोगात घोटाळा आहे. सगळ्या जगाने ईव्हीएम नाकारलं आहे आणि हे शहाणे आले आहेत का? राजीव कुमार उद्या निवृत्त होतील मग मोदी त्यांना बक्षीस देतील अशी बोचरी टीका संजय राऊत यांनी केली आहे.

ताटाखालचं मांजर

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश, घटनात्मक पदावरचे व्यक्ती यांच्याकडून हवी ती कामं करुन घ्यायची आणि त्यानंतर त्यांना बक्षीस द्यायचं, राज्यपाल करायचं, राजदूत म्हणून कुठे पाठवायचं हेच सुरु आहे. महाराष्ट्रात निवडणूक घोटाळा झाला, हरियाणात झाला आहे. निवडणूक आयोगाने मरकवाडीला येऊन बसलं पाहिजे, मरकवाडीच्या जनतेची मागणी होती की ते स्वखर्चाने बॅलेट पेपरवर निवडणूक घेणार होतं. मग राजीव कुमार यांना तफावत दिसली असती.

निवडणूक यंत्रणा भाजपाने हायजॅक केली आहे, लोकशाही हायजॅक केली आहे. लोकशाहीचं रक्षण करणारे चाचेगिरी करत आहेत. दिल्ली निवडणुकीतही मतदार यादीतला घोटाळा होतो आहे. महाराष्ट्रातही तेच झालं, हरियाणातही तेच झालं असाही आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. निवडणूक आयोग सरकारच्या ताटाखालचं मांजर झाला आहे अशीही टीका राऊत यांनी केली.

 

follow us