Sanjay Raut Health worsened admitted Mulunds Fortis Hospital after Press Conference end : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची आज झालेल्या पत्रकार परिषदेनंतर प्रकृती बिघडलेली आहे. त्यानंतर त्यांना मुंबईतील मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे.
घायवळ आणि भाजपची मिडिया! रविंद्र धंगेकरांचा हल्लाबोल, पत्रकार परिषदेत थेट नावंचं घेतले…
दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वीच राऊत यांची फोर्टीस हॉस्पिटलमध्ये रक्त तपासणी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना तातडीने मुंबईतील मुलुंडमधील फोर्टीस रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यावेळी त्यांची पत्रकार परिषद सुरू होती. त्यानंतर लगेचच त्यांना दाखल करण्यात आले आहे.
नेहमी प्रमाणे आजही सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यामध्ये त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चेत असलेल्या उद्धव आणि राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेबद्दल माहिती दिली. यावेळी त्यांनी सांगितलं की, स्वत: राज ठाकरे यांची देखील महाविकास आघाडीमधील घटक पक्ष असलेल्या कॉंग्रेसलासोबत घ्यावे. राऊतांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये मात्र चर्चेला उधाण आले आहे.
मातोश्रीवर राज ठाकरेंचा सहकुटुंब स्नेहभोजन कार्यक्रम
मागील काही महिन्यांत ठाकरे बंधू (Thackeray Borther) अनेकदा एकत्र दिसले आहेत. 5 जुलै 2025 रोजी मराठी भाषा मेळाव्यात दोघेही एकाच मंचावर आले होते, त्यानंतर 27 जुलैला उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज ठाकरे (Raj Thackeray) मातोश्रीवर गेले होते. त्याचप्रमाणे 27 ऑगस्टला उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंच्या गणेशोत्सवाला शिवतीर्थ निवासस्थानी हजेरी लावली. पुढे 10 सप्टेंबरला गणेश मुहूर्तावर, तसेच 5 ऑक्टोबर रोजी संजय राऊत यांच्या नातवाच्या नामकरण सोहळ्यात ठाकरे बंधू (Udhhav Thackeray) पुन्हा एकत्र दिसले. आणि आता, 12 ऑक्टोबरला राज ठाकरे सहकुटुंब मातोश्रीवर स्नेहभोजनासाठी पोहोचले. ज्यामुळे या भेटींची मालिका अधिक गहिरी झाली आहे.