Download App

Demonetization : “लहरी राजा अन् हवेतील निर्णय…” : मोदी सरकारच्या निर्णयाविरोधात चढला राऊतांचा पारा

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने मोठा निर्णय घेत बाजारातून 2000 रुपयांच्या नोटा (2000 rupee notes) बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. ३० सप्टेंबर 2023 पर्यंत सध्या चलनात असलेल्या नोटा वापरता वापरता येतील, असे आरबीआयने म्हटले आहे. यासोबतच नागरिकांना 2000 रुपयांच्या नोटा बदलण्यासाठी चार महिन्यांची मुदत देण्यात आली आहे. दरम्यान, या निर्णयाचा परिणाम आता राजकीय वर्तुळातही दिसून येत आहे. याबाबत अनेक प्रकारच्या राजकीय प्रतिक्रियाही येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनीही या निर्णयावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. (Sanjay Raut On 2000 Demonetization)

गाजावाजा करून मोदींनी दोन हजाराची नोट चलनात आणली होती. आणि आता ती दोन हजाराची नोट बंद करण्यात आली आहे. मोदी सरकार अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा करत आहे, अशी टीका राऊतांनी केली. ते नांदेडमध्ये पत्रकारांशी संवाद साधत होते.

Weather Update : पुढील तीन दिवस राज्यात तापमान वाढणार, हवामान विभागाने दिला इशारा

राऊत बोलतांना म्हणाले की, एक लहरी राजा असतो आणि तो हवेत निर्णय घेतो. गेल्यावेळी नोटबंदी करतांना भ्रष्टाचार आणि दहशतवाद कमी व्हावा यासाठी नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलं. पण भ्रष्टाचार बोकाळला आहे, काळा पैसा अजूनही आहे. परदेशातून काळा पैसा परत आला नाही. दहशतवाद्यांना अर्थपुरवठा करणाऱ्यांच कंबरडं मोडलं जाईल, असं सांगण्यात आलं. पण, तेही उद्दिष्ट साध्य झालं नाही. लोकांना रांगेत उभं केलं. लोकांच्या नोकऱ्या गेल्या. लोकांना अत्यावस्थ केलं. परत शेवटी त्याच मार्गाला ते आले. हजाराची नोट बंद केली, ती परत येणार आहे. गाजावाजा करून दोन हजाराची नोट दाखवत होते मोदी. या सरकारने भारतीय अर्थव्यवस्थेचा खेळखंडोबा केला आहे, त्यामुळं महागाईपासून बेरोजगारीपर्यंत प्रश्नांचा भस्मासूनर उभा राहिला, असं राऊत म्हणाले.

रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला ग्रीन सिग्नल मिळाला आहे. पुढील आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता असल्याचं बोलल जातं. यावरही राऊत यांनी भाष्य केलं. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यास तो पूर्णपणे बेकायदेशीर ठरेल. कारण हे सरकारच मुळात घटनाबाह्य आणि बेकायदेशीर आहे. सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत अजून निर्णय व्हायचा आहे असेही राऊत यांनी सांगितलं

Tags

follow us