Weather Update : पुढील तीन दिवस राज्यात तापमान वाढणार, हवामान विभागाने दिला इशारा
Temperature will increase in Maharashtra : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह देशात अवकाळी पावसाने थैमान घातलं आहे. त्यामुळे शेतीचं प्रचंड नुकसान होऊन शेतकरी हवालदिल झालेला आहे. यामध्ये आता भारतीय हवामान विभागाने तापमान वाढीचा इशारा दिला आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक असल्याचं सांगण्यात येत आहे.
सध्या राज्यातील तापमानात वाढ झाल्याने तापमानात वाढ झाली आहे. तसेच पुढील तीन दिवस राज्यात तापमानाचा पारा आणखी वाढणार आहे. असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. यामुळे विदर्भ, मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये आताच 40 अंशांच्यवर तापमान आहे. त्यामध्ये आणखी भर पडल्यास उष्माघाताचे प्रमाण वाढणार आहे.
राज्यात गुरूवारी कमाल तापमानाची नोंद झाली. यामध्ये वर्धा येथे सर्वाधिक कमाल 43 अंश सेल्सअस आणि बुलढाणा येथे सर्वात कमी किमान तापमानाची नोंद झाली. तर आज शनिवार 20 मे ला हवामान खात्याच्या अंदाजानुसार तापमानात वाढ होणार असून पुढील तीन दिवस ही वाढ कायम राहणार आहे.
दुसरीकडे आता सर्वांनाच मान्सूनच्या पावसाची (Monsoon rains) प्रतीक्षा आहे. यंदा मान्सून उशिरा येण्याचा अंदाज हवामान खात्याने (Meteorological Department) वर्तवला होता. दरवर्षी 22 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल होतो. मात्र यंदा मान्सून अंदमानच्या काही भागात तीन दिवस आधीच दाखल झाला आहे.