Sanjay Raut on Ahilyanagar Municiple Corporation Curruption and Sangram Jagtap : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत त्यांच्या दररोजच्या पत्रकार परिषदेमध्ये सरकारवर निशाणा साधत असतात. त्यात आजच्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी अहिल्यानगर महानगरपालिकेत तब्बल 350 ते 400 कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यावेळी त्यांनी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांना त्यांच्या हिंदुत्वाच्या भूमिकेवरून टोला देखील लगावला आहे.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
अहिल्यानगर महानगरपालिकेत वारंवार भ्रष्टाचार सुरू आहे. त्या संदर्भात ठाकरे गटाचे अहिल्यानगर शहर प्रमुख किरण काळे यांनी मुख्यमंत्री, अँटी करप्शनकडे, जिल्ह्यातील या संदर्भातील संबंधित अधिकाऱ्यांकडे मागील दोन वर्षांपासून तक्रार, पाठपुरावा करत आहेत. अहिल्यानगरमध्ये रस्ते जागेवर नाहीत, रस्ते शोधावे लागतात, नागरी सुविधा नाहीत, रस्त्यांच्या या कामांमुळे जनतेचे पावसाळ्यात प्रचंड हाल सुरू आहेत. प्रशासक, ठेकेदार आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमतातून अहिल्यानगरची महानगरपालिका हे या महाराष्ट्रातील दरोडेखोरीच एक उत्तम नमुना आहे.
Video : देवेंद्र फडणवीस प्रभू श्रीराम यांच्यासारखे चारित्र्यवान; फुकेंकडून फडणवीसांवर कौतुक वर्षाव
त्याची चौकशी व्हावी. यासाठी काळे यांनी निवेदनं दिली, तक्रारी केल्या. तरी देखील भ्रष्टाचाऱ्यांवर कारवाई होत नाही. म्हणून मी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुराव्यांसह या स्कॅमची फाईल पाठवली आहे. जर मुख्यमंत्री अशा प्रकारच्या भ्रष्टाचाराच्या तक्रारींवर कारवाया करत नसतील तर शिवसेना त्यांना सोडणार नाही. त्यांची जागा तुरुंगातच आहे. ज्या अहिल्यानगरमध्ये हा भ्रष्टाचार झाला आहे. तेथील आताचे आमदार, माजी महापौर, नगरसेवक हे सगळे तुमच्या महायुतीत आहेत. मग हा सुद्धा जन सुरक्षेचा मुद्दा नाही का? असा खडा सवाल खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना केला आहे.
चित्रपट प्रेक्षकांसाठी एक आनंदाची बातमी! कोणताही चित्रपट केवळ 200 रूपयांत; मराठीचं काय?
या घोटाळ्या संदर्भात काळे यांनी मुंबईत खासदार राऊत यांची समक्ष भेट घेत या संदर्भातील पुराव्यांची फाईल त्यांना दिली होती. त्यानंतर राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित ती फाईलच सरकारला दिली आहे. मुंबईत बुधवारी सकाळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची व आमदारांच्या राडेबाजीची रोज नवीन प्रकरणे समोर येत आहेत. भ्रष्टाचाराच्या संदर्भात महाराष्ट्रात एक प्रकारची अनागोंदी माजली असून महापालिकेतील प्रशासक व अधिकारी संगणमताने शासकीय तिजोरीची लूट करीत आहेत. अहिल्यानगर महानगरपालिकेतील प्रकरण धक्कादायक आहे.
पुणे-परभणी बसमध्ये थरार; चालत्या बसमध्ये जन्मलेल्या नवजात बाळाला महिलेने खिडकीतून फेकलं
अहिल्यानगर महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी, ठेकेदारांच्या गॅंग यांनी आपल्याच महायुती सरकारच्या आमदार असणाऱ्या संग्राम जगताप यांच्या वरदहस्ताने संगणमत करत कटकारस्थान रचून अहिल्यानगर शहरातील सन 2016 ते 2020 या चार वर्षांच्या कालावधीत 776 रस्त्यांच्या सुमारे 350 ते 400 कोटींहून अधिक रकमेचा महाघोटाळा करत भ्रष्टाचार केला आहे. हा अहिल्यानगर मधील आज वरचा सर्वात मोठा स्कॅम असून संबंधित लोक हे सरकारला समर्थन देत असल्यामुळे हा स्कॅम दडपला जात आहे.
हा घोटाळा अहिल्यानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख किरण काळे यांनी पुराव्यानिशी उघड केला आहे. तुमचे महायुतीचे सरकार राज्यात सत्तेत असताना दि. 8 मे 2023 रोजी त्यांनी पहिली तक्रार अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आयुक्तांसह मा. जिल्हा पोलीस अधीक्षक, तसेच आपल्याच सरकारमधील महसूल मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती. त्यानंतर त्यांनी आजवर नगर विकास विभाग, गृह विभाग तसेच या मनपाला कामांची बिले अदा करण्यात पूर्वी आवश्यक असणारे दिले जाणारे गुणवत्तांचे प्रमाणपत्र ज्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाअंतर्गत असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर या संस्थेच्या वतीने दिले जाते त्यांच्याकडे वारंवार लेखी पाठपुरावा केला.
समृद्धी झालं आता शक्तीपीठमध्ये 30 हजार कोटी ढापणार, नाद करती काय! रोहित पवारांची सरकारवर हल्लाबोल
राऊतांनी पत्रात पुढे म्हटले आहे, काळे यांच्या तक्रारीवरून आणि केलेल्या आंदोलनानंतर शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगर यांनी दि. 16/06/2023 रोजी पाच सदस्य समिती गठीत केली. या समितीने सर्व उपलब्ध कागदपत्र, पुरावे यांची सखोल पडताळणी केली असता सुमारे 776 रस्त्यांच्या कामांची शेकडो कोटींची बिले लाटण्यासाठी महानगरपालिकेच्या आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, मनपा सार्वजनिक बांधकाम विभागाचे शहर अभियंता, इतर अभियंते, या विभागातील कर्मचारी, आपल्या महायुतीच्या आमदारांचे कार्यकर्ते असणारे शेकडो ठेकेदार यांनी राजकीय वरदहस्थातून संगणमत करून कटकारस्थान करून शासकीय तंत्रनिकेतन, अहिल्यानगरच्या काही भ्रष्ट लोकांना हाताशी धरून शासनाची संस्था असणाऱ्या शासकीय तंत्रनिकेतनच्या नावाने बनावट लेटरहेड, बनावट शिक्के, राजपत्रित असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या नावांचे बनावट शिक्के, त्यांचा खोट्या सह्या करून हा महाघोटाळा केला आहे.
युतीच्या चर्चा आता तुमच्याशी करायच्या का? राज ठाकरेंचा संताप, सोशल मीडियातील पोस्ट काय..
या घोटाळ्यामध्ये महायुतीच्या विद्यमान आमदारांसह आज आपल्याला समर्थन देणाऱ्या शिंदे गटात असणाऱ्या तत्कालीन महापौर, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्याने झालेले भारतीय जनता पार्टीचे महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा वरदहस्त आहे. या महाघोटाळ्याचा मलिदा हा तुमच्या महायुती सरकारच्या भ्रष्ट नेते, पदाधिकारी यांनी संगनमत करत लाटला आहे.
अहिल्यानगर शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांना रस्त्यांसारख्या मूलभूत सेवेला मुकावे लागले आहे. हा सर्वसामान्य जनतेच्या तिजोरीवर घातलेला दरोडा आहे. विशेष म्हणजे काळे यांनी दिनांक 28 नोव्हेंबर 2023 रोजी अँटी करप्शनच्या राज्याच्या मा. अप्पर पोलीस महासंचालक यांच्याकडे फिर्याद दाखल केली होती. मात्र अँटी करप्शनने देखील आपल्या सरकारच्या राजकीय दबावातून आपल्या भ्रष्ट लोकांना वाचवण्यासाठी भ्रष्टाचायांवर कोणतेही गुन्हे दाखल केलेले नाहीत.
सन 2020 ते 2023 या काळातही मोठा स्कॅम :
या चार वर्षां व्यतिरिक्त सन 2020 ते 2023 या कालावधीत देखील अशाच प्रकारच्या मोड ऑफ ऑपप्रेंडस – कार्यप्रणालीच्या माध्यमातून सुमारे 200 ते 300 कोटी रुपयांच्या तितक्याच रकमेचा घोटाळा झाला असण्याची दाट शक्यता असल्याचे राऊत यांनी पत्रात म्हटले आहे. याबाबत देखील तक्रार करूनही कोणतीही चौकशी जाणीवपूर्वक भ्रष्टाचार दडपण्याच्या हेतूने करण्यात आलेली नाही.
ChatGPT Down : जगभरात ChatGPT ठप्प, हजारो युजर्सच्या तक्रारींचा पाऊस; कंपनीनेही दिलं उत्तर
अहिल्यानगर शहराचे नागरिक रस्त्यांच्या समस्येमुळे मेटाकुटीला आले आहेत. सरकार त्यांना रस्ते ही देऊ शकत नसेल तर अशा सत्तेचा काय उपयोग. गुन्ह्याची व्याप्ती पाहता या प्रकरणातील आरोपींची संख्या ही प्रचंड मोठी आहे. जनतेची लूट करणाऱ्या आपल्या सरकारच्या वरदहस्ताने अशा साखळी पद्धतीने भ्रष्टाचार करणाऱ्या भ्रष्टाचारांची जागा ही तुरुंगात असायला हवी, असे राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिले आहे.
तात्काळ गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी :
अहिल्यानगरच्या जनतेच्या व्यापक जनहितार्थ आपण या तक्रारीची दखल घेत तात्काळ सर्व दोषींवर उपलब्ध चौकशी अहवालाच्या आधारे गंभीर स्वरूपाचे फौजदारी खटले दाखल करून दोषींना तात्काळ अटक करत त्यांची तुरुंगात रवानगी करावी, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे राऊत यांनी केली आहे.