राहुल गांधींना विचारधारा बदलण्याचे आदेश देऊ शकत नाही; सावरकरविरोधी वक्तव्यांवरील याचिका न्यायालयाने फेटाळली

Court dismisses plea on anti-Savarkar statements agaist Rahul Gandhi : लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्धच्या वक्तव्ये केली होती. त्या वक्तव्यांविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. यामध्ये म्हटलं होतं की, राहुल गांधींची स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्धच्या वक्तव्ये त्यांच्याबद्दल काहीही न वाचता केलेली आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाविषयी वाचण्याचे आदेश दिले जावेत. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
ChatGPT Down : जगभरात ChatGPT ठप्प, हजारो युजर्सच्या तक्रारींचा पाऊस; कंपनीनेही दिलं उत्तर
मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश आलोक अराधे आणि न्यायमूर्ति संदीप मार्ने यांच्या खंडपीठाने या प्रकरणावर सुनावणी देताना म्हटले आहे की, राहुल गांधींना सावरकरांविषयी वाचण्याचे आदेश देऊ शकत नाही. कारण न्यायालय कोणत्याही नेत्याला त्याची विचारधारा बदण्याचे आदेश देऊ शकत नाही.
मुंबई, पुणे अन् कोकणात आजही मुसळधार; ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज, यलो अलर्ट जारी
दरम्यान ही याचिका अभिनव भारत कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष डॉ. पंकज फडणीस यांनी ही याचिका दाखल केली होती. यामध्ये म्हटल होतं की,राहुल गांधींची स्वातंत्र्यवीर सावरकरांविरूद्धच्या वक्तव्ये त्यांच्याबद्दल काहीही न वाचता केलेली आहेत. त्यामुळे त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाविषयी वाचण्याचे आदेश दिले जावेत. जेणे करून त्यांना स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनाविषयी योग्य माहिती मिळेल. मात्र न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे.
दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणात राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुप्रीम कोर्टाने चांगलेच फटकरले होते. तसेच कोर्टाने राहुल यांना जारी करण्यात आलेले समन्स रद्द करण्याच्या अलाहाबाद हायकोर्टच्या आदेशांना स्थगिती दिली होती. तसेच कोर्टाने सावरकरांवरील वक्तव्यावरून राहुल गांधींना महात्मा गांधींनाही इंग्रजांचे नोकर म्हणणार का? असा सवाल करत फटकारले होते.