Download App

Sanjay Raut : केंद्राने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण..,

मुंबई : केंद्र सरकारने महाराष्ट्राच्या गुढीवरच आक्रमण केलंय पण महाराष्ट्र पुन्हा त्याचं जोमाने गुढी उभारणार असल्याचा निर्धार ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी गुढीपाडव्यानिमित्त जनतेला शुभेच्छाही दिल्या आहेत.

World Water Day : एक लिटर पाण्यासाठी मोजावे लागतात लाखो डॉलर, काय आहे याच कारण?

राऊत म्हणाले, महाराष्ट्राची गुढी म्हणून शिवसेनेचा उल्लेख केला जातो. पण केंद्र सरकारने मोगलाई पद्धतीने गुढीवर आक्रमण केलं आहे. पण जनतेचा संकल्प आहे की, महाराष्ट्र पुन्हा गुढी उभारणार असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच एकीकडे अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे उत्साहाचं वातावरण आहे. शेतकरी दु:खी आहे. नवे वर्ष येऊन ही आनंद नसल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

विखे तुम्हा सगळ्यांना भारी पडतील; जयंत पाटलांचा BJPला इशारा, विखे खळखळून हसले

यावेळी बोलताना त्यांनी राज ठाकरे यांच्यावरीही भाष्य केलं आहे. देशात देशात लोकशाही आहे, कोणी ही मुख्यमंत्री होऊ शकतो. आमचा लोकशाहीवर विश्वास असून बहुमत हे चंचल असं असते, आज आमच्याकडे असेल उद्या दुसऱ्या कोणाकडे असेल, असंही ते म्हणाल आहेत.

दरम्यान, संजय राऊत यांनी मंत्री दादा भुसे यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर भुसेंनीही त्यांना शरद पवारांची चाकरी करत असल्याचा टोला लगावला होता. त्यानंतर राऊत आणि भुसे यांच्यात जोरदार वाकयुद्ध सुरु असल्याचं पाहायला मिळालंय.

Tags

follow us