Sanjay raut on Eknath shinde before Shivsena Party and Symbol Cas hearing in Supreme Court : शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हावरून (Shiv Sena Name and Symbol Case) सुरू असलेल्या ठाकरे आणि शिंदे गटातील कायदेशीर संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात आज (2 सप्टेंबर) पुन्हा सुनावणी होणार आहे. दुपारी 2 वाजल्यानंतर या प्रकरणातील पुढील युक्तिवादाला सुरुवात होईल. त्या अगोदर संजय राऊतांनी पत्रकार परीषदेतून शिंदेंवर जोरदार टीका केली आहे.
नेमकं काय म्हणाले संजय राऊत?
ही एक ऐतिहासिक घटना सुरू आहे. देशात संविधानाचं महत्त्व राहणार आहे का? देशामध्ये पक्षांतरांना न्यायालय आणि निवडणूक आयोग अशा प्रकारे मोकळं रान देणार आहेत का? यावर फार मोठं चिंतन न्यायालयात सुरू आहे.गेल्या तीन वर्षांत निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट, महाराष्ट्राचे राज्यपाल आणि महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांनी भारतीय जनता पक्षाच्या, विशेषतः अमित शहांच्या दबावाखाली निर्णय घेतले.
‘सायको रंगा’मध्ये कलाकारांची दमदार फळी! चित्रपट ‘या’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला
आता अंतिम लढाई सुरू आहे. आता नाही तर कधीच नाही. शिवसेनेच्या वतीने आम्हाला जे म्हणणं मांडायचं होतं, ते आम्ही पूर्णपणे मांडलं आहे. कपिल सिब्बल आणि कामत यांनी अत्यंत धुवांधार पद्धतीने यापूर्वीच्या निवडणूक आयोगाच्या, विधानसभा अध्यक्षांच्या आणि राज्यपालांच्या बेकायदेशीर निर्णयांची चिरफाड केली आहे.
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात हायकोर्टाचा मोठा निर्णय; FIR दाखल करण्याचे आदेश, CBI कडे तपास
आता सात ते आठ दिवस युक्तिवाद चालेल. दोन्ही बाजू आपापली भूमिका मांडतील. शेवटी घटनापीठाला घटनात्मक चौकटीत राहून निर्णय द्यावा लागेल. कोणत्याही दबावाखाली हा निर्णय होणार नाही, अशी आम्हाला खात्री आहे. देशाला एक ऐतिहासिक आणि स्वच्छ निर्णय मिळेल आणि भविष्यातील पक्षांतरांना आळा बसेल, असा निकाल आम्हाला अपेक्षित आहे.
एकीकडे डिफेंडर गाडी पण जरांगेंना उपोषणाला ‘ती’ लाल गोधडीच का लागते? हाकेंना वेगळाच संशय
कोणी दिल्लीला गेले असेल, कॅबिनेटची बैठक सोडून वारंवार उपमुख्यमंत्री बाहेर जात असतील, तर राज्यात महत्त्वाचे प्रश्न असताना ते दिल्लीला जाऊन काय करतात, हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आदिवासी रस्त्यावर आले आहेत, मराठवाड्यात मनोज जरांगे पाटील यांनी आव्हान उभं केलं आहे. अशा परिस्थितीत राज्याच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी दिल्लीला जाण्याची गरज काय? शेवटी न्यायालयात संविधानाच्या बाजूने निकाल लागेल आणि संविधानाचा विजय होईल, अशी आम्हाला खात्री आहे.
जरांगे खालावले, मराठे पेटले! बीड-जालन्यात जाळपोळीसह मोठा राडा!
धनुष्यबाण गोठवला कोणी? चोरला कोणी? त्यावर डाका कोणी घातला? अमित शहांच्या मदतीने तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचा धनुष्यबाण चोरला आणि त्यावर डाका घातला. कायदा विकत घेता येतो का? कायदा हा कायदाच असतो. धनुष्यबाण गोठवण्याची वेळ तुमच्यामुळे आली आहे. जेव्हा हे निकाल लागतील, तेव्हा हळूहळू काही गोष्टींची जाणीव त्यांना होईल. एकनाथ शिंदे यांना स्वतःच्या कृतीची लाज वाटेल. भक्कम वगैरे काही नाही. हा पैशांचा खेळ आहे. एकनाथ शिंदे यांच्याकडे भक्कमपणा आहे तरी कुठे? कोर्टात उभं राहून ते न्यायमूर्तींवर दबाव आणू शकतात का? ‘जिथे शिंदे, तिथे सौदा’ अशी नवी डिक्शनरी आता येत आहे. त्यामध्ये ‘जिथे सौदा, तिथे शिंदे’ असा अर्थ असणार.
