Download App

Sharad Pawar यांच्या अदानींबद्दलच्या भूमिकेवर संजय राऊत म्हणाले…

Sharad Pawar On Hindenburg : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल एका कार्यक्रमात हिंडेनबर्ग अहवालानंतर गौतम अदानींवर (Gautam Adani) झालेल्या आरोपाप्रकरणी मोठे वक्तव्य केले होते. त्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत या प्रकरणात जेपीसी ऐवजी सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली समितीच जास्त योग्य असल्याचे सांगितले. त्यांच्या या वक्तव्याने अदानींच्या चौकशसाठी जेपीसी नियुक्त करण्याची मागणी करणाऱ्या काँग्रेससह अन्य पक्षांना मोठा धक्का बसला आहे.

त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आपली पत्रकार परिषदेत प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी राऊत म्हणाले, गौतम अदानींच्या हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात जेपीसी समितीडून चौकशी होऊ नये ही शरद पवारांची भूमिका पहिल्यापासून आहे. यात काही नवल नाही. शरद पवार यांनी अदानी संदर्भात वेगळे भूमिका जरी मांडली असली तरी महाविकास आघाडीमध्ये तडे जाणार नाहीत. मला वाटत नाही शरद पवार यांनी अदानींना क्लीन चिट दिली.

पुढे संजय राऊत असं देखील म्हणाले की, गौतम अदानींच्या हिंडेनबर्ग अहवालासंदर्भात चौकशीच्या पर्यायांसंदर्भात पवारांनी मत व्यक्त केलं आहे. हे त्यांचं मत आहे. ते ज्येष्ठ नेते आहेत. कारण जेपीसीमध्ये चेअरमन हा त्यांचा असतो. मात्र ज्या पर्यायांनी, मार्गांनी दोषींना शिक्षा मिळेल तो पर्याय आम्हाला मान्य आहे. कारण सरकार एका उद्योगपतीसाठी आपल्या देशाची प्रतिष्ठा पणाला लावत आहे. असा आरोप देखील यावेळी राऊतांनी केंद्र सरकारवर केला आहे.

अदानींची वीज तयार होते मग, विरोधकांची एकजूट कशी खराब होईल? ; पवारांचा मिश्कील प्रश्न

दरम्यान जेपीसीवर शरद पवार म्हणाले, ‘माझा जेपीसीला विरोध नाही. मात्र, या समितीत सत्ताधारी पक्षाचेच लोक जास्त असल्याने या चौकाशीतून किती सत्य बाहेर येईल याची शंका आहे. आपल्यासमोर आणखी अत्यंत महत्वाच्या अशा तीन समस्या आहेत. त्या म्हणजे बेरोजगारी, वाढती महागाई आणि शेतकऱ्यांचे प्रश्न. या तीनही समस्यांकडे लक्ष देण्याची अत्यंत आवश्यकता आहे. आम्ही विरोधक म्हणून या समस्यांकडे जास्त लक्ष केंद्रीत करणार आहोत’,

Tags

follow us