Sanjay Raut : कर्नाटक विधानसभा निवडणूक (Karnataka Assembly Elections) निकालांमुळं महाराष्ट्रातील राजकीय वातावरणही ढवळून निघालं आहे. राज्यात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय कलगीतुरा सुरू झालेला असतांनाच राज्याच्या काही भागात दंगलसदृश्य तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. यावरून राजकीय आरोप-प्रत्योरोप केले जात आहेत. अशातच आता ठाकरे गटाचे नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यातील सामजिक सलोखा बिघडवण्याचा खेळ सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली.
महाराष्ट्रातला सामाजिक सलोखा बिघडविण्याचा हा प्रयत्न आहे. नकली हिंदुत्वाच्या नावावर काही टोळ्या निर्माण करुन वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न. मला काही कट दिसत आहे, आमचे हिंदुत्व कडवट, नकली हिंदुत्व नाही. आमच्यासाठी त्र्यंबकेश्वर श्रद्धास्थान, माझ्या माहिती प्रमाणे तिथे कुणी घुसलं नाही. मुस्लिम लोक संदलच्या दरम्यान तिथं पायरीवर धूप दाखवतात, आरती करतात. मुस्लिम दर्ग्यावर हिंदू लोकही जातात, हाजी अली, अजमेर अशा ठिकाणी हिंदू लोक जातात, आरएसएसवालेदेखील जातात, असे ते म्हणाले आहेत.
Trimbakeshwar Temple : ‘ते’ पत्र बळजबरीने लिहून घेतले; राऊतांचा सत्ताधाऱ्यांवर मोठा आरोप
देशद्रोही कोण हे स्पष्ट दिसत आहे, आरएसएसचा प्रचारक प्रमुख पाकिस्तानच्या हनीट्रॅप मध्ये अडकला आहे. कुरुलकर प्रकरण हे सर्व भाजपच्या संबंधीत आहे. तिथं एसआयटीची स्थापना करा आणि चौकशी करा इथं काय एसआयटी स्थापना करत आहात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. त्यांच्यावरील दुर्लक्ष करण्यासाठी त्र्यंबकेश्वर आणि शेवगाव सारख्या दंगली घडविल्या जात असल्याचा आरोप राऊतांनी केला आहे.
Adipurush: ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या वादात अभिनेता प्रभासच्या पोस्टरनं वेधलं लक्ष