Download App

काही लोकांना दोन्ही भाऊ अन् समविचारी पक्ष एकत्र..राऊतांनी ठाकरे बंधू एकत्र येण्यावर फोडला बॉम्ब

कोणतीही अट शर्त नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हे देखील म्हणत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut On Thackeray Together : राज्याच्या राजकारणात दोन्ही ठाकरे बंधू एकत्र ऐण्यी चर्चा सुरू आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. तसंच, उद्धव ठाकरे यांनी मनसेबरोबर युती करण्यास कोणत्या अटी ठेवल्या आहेत का? याविषयी संजय राऊत यांनी ठाकरे गटाची सविस्तर भूमिका आज माध्यमांशी बोलताना मांडली. कोणत्याही अटी ठेवल्या नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत काय म्हणाले?

काही लोकांना दोन्ही भाऊ किंवा समविचारी पक्ष एकत्र आलेले नको असतात. त्यामुळे अशा प्रकारचे काटे मारत असतात. राज ठाकरे यांनी एक विषय मांडला. तो विषय होता महाराष्ट्राच्या हिताचा. राज ठाकरे यांनी विषय मांडल्यानंतर त्यानंतर लगेच काही क्षणात उद्धव ठाकरे यांनी देखील प्रतिसाद दिला. तो प्रतिसाद देखील महाराष्ट्राच्या हिताचा होता. आता यामध्ये अटी-शर्ती आल्या का? तर नाही आल्या. मला सांगा कोणती अट आणि कोणती शर्त आहे? जर दोन पक्षाचे नेते ते भाऊ आहेत, ते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र येण्याच्या विषयांवर सहमती होतेय, तर त्यामध्ये जास्त वादविवाद करणं हिताचं नाही, या मताचा मी आहे, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

कामाचं बोला…, ठाकरे बंधूंच्या युतीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भडकले

कोणतीही अट शर्त नाही. राज ठाकरे म्हणत आहेत की महाराष्ट्र हितासाठी आणि उद्धव ठाकरे हे देखील म्हणत आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी, मग प्रश्न एवढाच आहे की महाराष्ट्र हिताच्या फॉर्म्युल्यात भाजपा बसत नाही. ही अट नाही, तर लोकभावना आहे. जर याला कोणी अट आणि शर्त म्हणत असेल तर त्यांनी राजकीय अभ्यास करणं गरजेचं आहे. हा विषय विशेषतः महाराष्ट्राच्या भावनेचा आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे, आम्ही महाराष्ट्र हितासाठी काम करत आहोत असंही राऊत म्हणाले.

मराठी माणसांचा स्वाभिमान हेच आमचं ध्येय आहे. आता जर मतभेद आणि वाद दूर ठेऊन जर दोन्ही ठाकरे एकत्र येणार असतील तर आम्ही त्यांचं स्वागत केलेलं आहे. यामध्ये कोणतीही अट किंवा शर्त उद्धव ठाकरे यांनी ठेवलेली नाही. महाराष्ट्र हितालाच प्राधान्य द्या, जे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या हिताचे शत्रू आहेत, त्यांच्या पंक्तीलाही बसू नका. यात कोणती अट आणि शर्त आहे? अजिबात नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

follow us