Download App

मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार; शिवसेना नेते संजय राऊतांचं थेट मुख्यमंत्र्यांना चॅलेंज

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी मराठी भाषेसंदर्भात पुन्हा एकदा मुख्यंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर घणाघाती टीका केली.

  • Written By: Last Updated:

Sanjay Raut on CM Devendra Fadnavis : मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचे आहे. (Fadnavis) आमच्या १०६ हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात, असा घणाघात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

देवेंद्र फडणवीसांनी नुकतंच एका मुलाखतीदरम्यान मराठी भाषेच्या नावे हिंसा होत असेल तर त्यावर कारवाई करणार असं म्हटलं होते. त्यावर संजय राऊत यांनी भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांचे जे सरकार आहे, या सरकारची निर्मिती खोक्यातून झाली आहे. ज्यांनी ५० खोके एकदम ओके अशी घोषणा कैलास गोरंट्याल यांनी दिली होती. त्यावेळी ते आमदार होते. यांनी विधानभवनाच्या आवारात विधानसभा सुरु असताना ही घोषणा त्यांनी दिली आणि मग ती देशात पसरली. आता ५० खोके एकदम ओके बोलणारे कैलास गोरंट्याल हे देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षात आहेत असा टोला राऊतांनी लगावलाय.

कैलास गोंरट्याल यांनी सांगितलं आहे की एका एका मतदार संघात निवडणूक जिंकण्यासाठी १०० कोटी खर्च केले. सरकारी वाहन, पोलिसांच्या वाहनातून पोलिसांचे वाटप सुरु होते. त्यानंतर गोंरट्याल असं म्हणतात की आमच्यासारखे कार्यकर्ते याला कुठं पुरे पडणार. त्यामुळे मला भाजपात यावं लागलं हे काल कैलास गोरंट्याल म्हटले आणि आज भाजपात आले. तेव्हा खोक्याची भाषा फडणवीसांनी करु नये, असंही संजय राऊत म्हणालेत. राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांनी १०० जागांवर कशाप्रकारे हेराफेरी केली, याबद्दल जी मोहीम उघडली आहे, त्याबद्दल देवेंद्र फडणवीसांनी बोलायला हवं. त्यांच्या मंत्रिमंडळात जे मंत्री बसलेले आहेत, अजूनही त्यांच्याकडे खोक्यांची ओढाताण सुरु आहे, त्यावर त्यांनी बोलावं असंही ते म्हणाले.

शेकापचा मंच, मराठीचा मुद्दा, फडणवीसांवर तुटून पडले राज ठाकरे!

महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरु आहेत, बेरोजगारी वाढते त्यावर त्यांनी बोलायला हवं. किती काळ तुम्ही उद्धव ठाकरेंवर अडकून पडणार आहात. आता उद्धव आणि राज एकत्र झालेत त्या धक्क्यातून ते सावरलेले नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना गंमतीजंमती करायची सवय आहे, याकडं एक विनोद म्हणून पाहायला हवं, असंही संजय राऊतांनी म्हटले. मराठी भाषेसंदर्भात आम्ही हिंसाचार करणार, काय उखाडायचे ते उखडा. देवेंद्र फडणवीस हा महाराष्ट्र आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत हे राज्य मराठी माणसांचं आहे. आमच्या १०६ हुतात्म्यांनी इथे बलिदान दिले आहे. तुम्ही दिलेले नाही. तुम्ही राज्याचे तुकडे करणारे लोक आहात. आज तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात म्हणून जरा गप्प आहात, ज्या दिवशी तुमचे मुख्यमंत्रिपद जाईल, तेव्हा तुम्ही वेगळा विदर्भ मागणार आहात असा थेट घणाघात राऊतांनी केलाय.

मराठी भाषेसाठी प्रसंगी आक्रमक होण्याची गरज लागली तर ते आम्ही होणार. तुम्ही मुरारजी देसाई व्हायला जाताय का, आमच्यावर गोळ्या घालणार आहात तुम्ही मराठीचा आग्रह करतोय म्हणून. हो आम्ही करतोय मराठीचा आग्रह. आम्ही गुजरातला जाऊन मराठीचा आग्रह करत नाही. तुमच्या गुजरातमध्ये आधी हिंदी सक्ती करा मग महाराष्ट्रावर ती लादा, असंही राऊतांनी म्हटलं. राज ठाकरे यांनी सांगितलेला मुद्दा अत्यंत महत्त्वाचा वीस लाख बिहारी आणि हिंदी भाषिकांना गुजरात मधून मारून हाकलून दिलं. त्या अल्पेश ठाकूरला तुम्ही नंतर आमदार केला तुम्ही आम्हाला काय सांगत आहात. तुम्ही नरेंद्र मोदी आणि अमित शहा काय म्हणतात ते पहा अमित शहा बोलत आहेत आम्ही गुजराती मग मी मराठी का बोलू शकत नाही. शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. देवेंद्र फडणवीस का तुम्हाला काय करायचं आहे ते करा असंही राऊत म्हणाले.

follow us