मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर केलेल्या एका पोस्टने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राऊतांनी पोस्टमध्ये एका बकऱ्याचा फोटो दाखवण्यात आला असून, या फोटोला खबर पता चली क्या? असा प्रश्न विचारत तीन अक्षरात ए सं शी असे लिहिले आहे. राऊतांना या पोस्टबाबत विचारण्यात आले असता त्यांनी तुम्हीच अभ्यास करा, असे उत्तर दिले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (UBT Sanjay Raut Goat Post On X)
त्याला कापण्याची तयारी करण्यात आली आहे
खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक्सवर एक पोस्ट केली आहे. यात त्यांनी एका बकऱ्याचा फोटो लावला आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एक बकरा खटकाजवळ उभा आहे. त्याला खटकाच्या लाकडावर उभे करण्यात आले आहे. त्याला कापण्याची तयारी करण्यात आल्याचेही राऊतांनी यावेळी सांगितले.
फक्त बे बे करत राहा
पुढे बोलताना राऊत म्हणाले की, महाराष्ट्रातील या बकऱ्याला दिल्ली दरबारातून स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की, फार शहाणपण करु नको. गप्प बस. फक्त बे बे करत राहा असे राऊतांनी सांगितले. या फोटोखाली लिहिलेले ए सं शी गट लिहिले आहे, त्याचा अर्थ काय? असे विचारल्यावर राऊत म्हणाले, ते तुम्हीच शोधा असे उत्तर राऊतांनी दिले. मात्र, राऊतांनी या फोटोच्या माध्यमातून कोड वर्डमधून एकप्रकारे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना (Eknath Shinde) डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे राऊतांची या पोस्टवर आता शिंदे गटाकडून काय प्रतिउत्तर दिले जाते हे पाहणे महत्त्वाटचे ठरणार आहे.
उद्धव ठाकरेंकडून एकनाथ शिंदेंचा उल्लेख ए सं शी
काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदेंवर बोलताना त्यांना ए सं शी असे म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर राऊतांनीदेखील ठाकरेंनी केलेल्या टीकेची रि ओढत शिंदेंचा ए सं शी असा उल्लेख केला आहे. परंतू, हा उल्लेख करताना राऊतांनी एका बकऱ्याचा फोटोदेखील पोस्ट केला आहे. त्यामुळे राऊतांच्या या पोस्टमुळे राज्यातील राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.