संजय राऊत हा मूर्खांच्या नंदनवनात वावरणारा आहे, त्याच्याकडे एवढे लक्ष देऊ नका अशी टीका आमदार संजय शिरसाठ यांची केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांची भेट झाली त्यावर संजय राऊत यांनी टीका केली होती, त्याला उत्तर देताना संजय शिरसाठ बोलत होते.
यावेळी ते म्हणाले की मुख्यमंत्री राज ठाकरे यांना भेटले त्यात वाईट काय आहे. एका ठाकरेला भेटले म्हणून दुसरे ठाकरे नाराज होतात का? राज ठाकरे यांच्याकडे व्हिजन आहे. एखाद्याचा चांगला गुण घेतला तर त्यात वाईट काय?
तानाजी सावंत म्हणाले, सत्तापरिवर्तनाचं 2019 पासूनचं प्लॅनिंग… पहिली बंडखोरी कोणाची?
ते पुढे म्हणाले की मी एकनाथ शिंदे यांना उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी घेऊन येतो त्यांची भेटायची तयारी आहे का? उद्धव ठाकरे यांच्याकडे काही चांगल्या सूचना असेल तर आदर करायला नको का? इतरांना भेटलं की यांच्या पोटात पोटसुळ उठतो ते तुमच्यासारखे नाहीत सकाळी उठायचं आणि कुत्र्यासारखं भो-भो भुंकायचं. राज ठाकरे एकदाच बोलतात पण सगळ्यांची हवा टाईट होऊन जाते. असं राज ठाकरे याचं कौतुक देखील त्यांनी केलं.
यावेळी संजय शिरसाठ यांनी राज्यात सुरु होणाऱ्या शिवधनुष्य यात्रेची माहिती दिली. ते म्हणाले की, ५ तारखेला आम्ही श्रीरामाचा धनुष्य घेऊन अयोध्येला जाऊ, त्याच दिवशी रात्री मुंबईत येऊन शिवतीर्थावर धनुष्य ठेवून नतमस्तक होऊ आणि तिथून सुरू होईल ती धनुष्यबाण यात्रा राज्यभर जाईल. त्याची सुरुवात छत्रपती संभाजी नगर मधून 8 किंवा 9 तारखेला रॅलीच्या माध्यमातून करू.
Nilesh Rane On Election: 2024 ची मॅच मला जिंकायची, निलेश राणेंचा विश्वास
धनुष्यबाण यात्रा फक्त धनुष्यबाणाची नसून, सरकारने घेतलेले निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचवणे, आरोग्य शिबिर घेणे, लोकांच्या अडीअडचणी समजून घेणे आणि नागरिकांच्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा समजून घेणे हे या यात्रेच्या माध्यमातून होणार आहे. ही राजकीय नाही तर सामाजिक यात्रा असणार आहे. ही रॅली जनसामान्याची सर्वसामान्यांची म्हणून आम्ही या रॅलीचे आयोजन केले आहे. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.