Sanjay Shirsath अंधारेंची माझ्या बायकोने ओटी भरली… ठाकरे गटात जाण्यापूर्वी त्यांनी मला विचारले…

छत्रपती संभाजीनगर : सुषमा अंधारे यांना मी बहिण मानतो. आमचं बहिण भावाचं नातं आहे. त्या जेव्हा माझ्या घरी आल्या तेव्हा माझ्या बायकोने साडी, चोळी देऊन त्यांची ओटी भरली होती. तसेच ठाकरे गटात जाऊ का म्हणून त्यांनी मलाच विचारले होते. आता त्या तिकडे जाऊन माझ्याच विरोधात बोलायला लागल्या आहेत. मी त्यांच्या विरोधात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेलं […]

Sushma Andhare

Sushma Andhare

छत्रपती संभाजीनगर : सुषमा अंधारे यांना मी बहिण मानतो. आमचं बहिण भावाचं नातं आहे. त्या जेव्हा माझ्या घरी आल्या तेव्हा माझ्या बायकोने साडी, चोळी देऊन त्यांची ओटी भरली होती. तसेच ठाकरे गटात जाऊ का म्हणून त्यांनी मलाच विचारले होते. आता त्या तिकडे जाऊन माझ्याच विरोधात बोलायला लागल्या आहेत. मी त्यांच्या विरोधात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेलं नाही. माझ्या विधानाचा विपर्यास करून ते फिरवत आहेत, असा आरोप शिवसेनेचे आमदार संजय शिरसाठ यांनी सुषमा अंधारे यांच्यावर केला आहे.

एकनाथ शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विषयी वादग्रस्त विधान केले. त्यामुळे त्या विधानावरुन राज्यातील महिलांमध्ये असंतोष पसरला आहे. राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गट शिवसेना महिला आघाडीच्यावतीने याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात येत आहे.

Sanjay Shirsat यांचा ठाकरेंना इशारा… तर तुम्हाला कपडे काढून फिरायला लावेन! – Letsupp

उद्धव ठाकरे गटाच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौकात आमदार शिरसाट यांच्याविरुद्ध जोरदार निदर्शने करण्यात आली.

संजय शिरसाठ म्हणाले की, सुषमा अंधारे यांचं आमचं बहिण आणि भावाचं नातं आहे. माझ्या बायकोनं त्यांची ओटी भरली होती. मी वापरलेल्या लफडी या शब्दाचा अर्थ फक्त आर्थिक घोटाळ्याशी संबंधित आहे. आर्थिक हितसंबंधाची लफडी अशा आशयाने तो मी वापरला होता.

संजय शिरसाठ म्हणतात, सुषमा अंधारे यांनीही भाषणातून बोलताना विचार करावा. कारण त्या मला वरातीतील घोडा असं त्या म्हणाल्या होत्या. त्यांना हे बोलणं शोभतं आहे का?

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Exit mobile version