Download App

मोबाईल स्वीच ऑफ करून बेपत्ता झाले… धनंजय देशमुख अखेर सापडले

Santosh Deshmukh Brother Dhananjay Deshmukh Protest : सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh Murder) यांचे बंधू धनंजय देशमुख सकाळपासून बेपत्ता होते. गावकऱ्यांनी त्यांच्या घातपाताचा संशय व्यक्त केला होता. पण अखेर धनंजय देशमुख अखेर सापडले आहेत. ते पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहे. त्यांनी कालच आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानुसार आज धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh Protest) आंदोलन करत आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी त्यांच्यासोबत फोनवरून संवाद साधलाय. त्यांना पाण्याच्या टाकीवरून खाली येण्याची विनंती केलीय.

नाव मागे घेतलं तर ठीक अन्यथा… सरकारने दंडासह वसुली ; भुजबळांचा लाडक्या बहि‍णींना इशारा

बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला एक महिन्यांहून जास्त कालावधी उलटलाय. तरीही अजून याप्रकरणातील एक आरोपी फरार आहे. तर इतर आरोपींवर मकोका लावण्यात आलाय. त्यातच आता वाल्मिक कराडवर देखील मोक्का लावावा अशी मागणी केली जातेय. या मागणीसाठी मस्साजोगचे ग्रामस्थ आंदोलन करत आहे. त्यातच आता सकाळपासून संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख सकाळपासून गायब झाले होते.

वादग्रस्त शक्तिपीठ महामार्गाला पुन्हा ‘बळ’; हिरवा कंदील दाखवत राज्य सरकारचे पहिले पाऊल

धनंजय देशमुख यांचा सकाळपासून मोबाईल देखील स्विच्ड ऑफ होता. त्यामुळे घरात मोठ्या प्रमाणात रडारड सुरु होती. पण अखेर ते सापडलेत. मस्साजोगच्या गावकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून ‘करो या मरो’ आंदोलन सुरु असल्याचं समोर आलंय. धनंजय देशमुख हे देखील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन करत आहेत. कालच त्यांनी स्वत:ला संपवण्याचा इशारा दिला होता.

सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात न्याय मिळत नसल्याची भूमिका देशमुख कुटुंबीयांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या भावाने आंदोलनाचा इशारा दिलाय. धनंजय देशमुख म्हणाले की, माझ्या या भूमिकेमागे मोठं कारण आहे. जर हे आरोपी सोडले, तर ते उद्या माझा खून करतील. हे मला पण असेच निर्घृण मारतील. मग माझ्या कुटुंबात न्याय मागणारं कोणी नसेल. याशिवाय माझ्या भावाला पण बरं वाटेल, की हा अशा पद्धतीने मारला गेला नाही. त्यामुळे मी स्वत:चं संपतो, असं वक्तव्य धनंजय देशमुख (Dhananjay Deshmukh) यांनी केलंय.

 

follow us