पुणे : वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली २५ लाख २३ हजार ५८३ इतकी मते मिळाली आहेत. म्हणजे याचा अर्थ शिवसेना + वंचित बहुजन आघाडी = १ कोटी ६७ लाख २१ हजार ६६६ इतकी मते आहेत. हे जे मतांचे समीकरण आहे ते भाजपा आणि त्यांचे मिंधे गटाचे चेले यांना पुरून उरणारे आहे. नव्हे २५ लाख मताधिक्य देणारे हे विजयी राजकीय समीकरण आहे. म्हणून भाजपाच्या नेत्यांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याने ते वायफळ बडबड करत सुटले आहेत, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे यांनी भाजप आणि मिंधे गटावर केली.
महाराष्ट्रातील मताचे राजकीय अंकगणित आणि भाजपाचा जळफळाट का होतोय याबाबत सर्वजीत वनसोडे यांनी आकडेवारीच्या माध्यमातून स्पष्ट केले. तरीही सर्व शक्यता ग्रहीत धरून प्राप्त परिस्थितीला सामोरे जाण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवावी, असे देखील ते म्हणाले.
सर्वजीत वनसोडे म्हणाले की, शिवसेनेला २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत स्वबळावर मिळालेली मते १ कोटी २ लाख ५ हजार ९७२ इतकी होती. तसेच शिवसेनेला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिळालेली मते १ कोटी २५ लाख ८९ हजार ६४ इतकी मते मिळाली होती. तर भाजपला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत १ कोटी ४९ लाख १२ हजार १३९ इतकी मते मिळाली आहेत. तसेच भाजपला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत १ कोटी ४१ लाख ९९ हजार ३७५ इतकी मते मिळाली आहेत. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ३७ लाख ४३ हजार ५६० + औरंगाबाद लोकसभा निवडणुकीत ३ लाख ८९ हजार ४२ मते अशी एकूण मिळालेली मते ४१ लाख ३२ हजार ६०२ इतकी आहेत. वंचित बहुजन आघाडीला २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेली २५ लाख २३ हजार ५८३ इतकी मते मिळाली आहेत. म्हणजे याचा अर्थ शिवसेना + वंचित बहुजन आघाडी = १ कोटी ६७ लाख २१ हजार ६६६ इतकी मते आहेत. हे जे मतांचे समीकरण आहे ते भाजपा आणि त्यांचे मिंधे गटाचे चेले यांना पुरून उरणारे आहे. नव्हे २५ लाख मताधिक्य देणारे हे विजयी राजकीय समीकरण आहे.