मोठी बातमी! सातारा झेडपी वादातील एसपी दोषींची सांगलीला बदली; निखिल पिंगळे नवे पोलीस अधीक्षक

Satara ZP controversy SP Tushar Doshi सातारा झेडपी राड्यामध्ये वादाच्या भवऱ्यात सापडलेले एसपी तुषार दोषी यांची अखेर सांगलीला बदली झाली आहे.

Satara ZP Controversy SP Tushar Doshi

Satara ZP Controversy SP Tushar Doshi

Satara ZP controversy SP Tushar Doshi transferred to Sangli Nikhil Pingle new Superintendent of Police : साताऱ्यामध्ये झालेल्या झेडपी अध्यक्ष निवडणुकीच्या राड्यामध्ये वादाच्या भवऱ्यात सापडलेले साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांची अखेर सांगलीला बदली झाली आहे. दोषी यांच्यानंतर आता साताऱ्याचे नवीन पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे हे असणार आहेत.

उद्या मोदींकडून होणार होतं उद्घाटन त्या अगोदरच रिफानरीला भीषण आग; नेमकं काय घडलं?

एकीकडे साताऱ्यामध्ये महेश शिंदे विरुद्ध शिवसेना आणि मंत्री शंभूराज देसाई असा वाद रंगलेला आहे. तसेच एकनाथ शिंदे यांच्या साताऱ्यामध्ये कार्यक्रम होणार असताना ही मोठी बातमी समोर आली आहे. सातारा जिल्हा परिषद निवडणुकीनंतर अध्यक्ष निवडीच्या वेळी जो काही वाद झाला. त्यामध्ये तुषार दोषी त्यांची भूमिका वादाच्या भोवऱ्यात सापडली होती.

Investment Tips : तुमची पण सॅलरी येताच संपतेय? मग, 50-30-20 चा फॉर्म्युला वापरा अन् श्रीमंत व्हा!

सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीदरम्यान झालेल्या गोंधळप्रकरणी राज्यात मोठी राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडाली असून या प्रकरणात सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्यावर अखेर कारवाई करण्यात आली होती. चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. त्यांच्या जागी अतिरिक्त पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्याकडे सातारा पोलीस अधीक्षक पदाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

त्याचबरोबर राज्यातील आणखी काही पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.

1 तुषार दोषी, पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक सातारा – पोलीस अधीक्षक, साांगली
2 निखिल पिंगळे, पोलीस उप आयुक्त, पुणे – पोलीस अधीक्षक, सातारा
3 संदिप घुगे, पोलीस अधीक्षक, साांगली पोलीस – पोलीस उप आयुक्त, सुरक्षा, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई
4 योगेश गुप्ता, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर – पोलीस उपमहानिरीक्षक, गडचिरोली परिक्षेत्र
5 निलोत्पल, पोलीस अधीक्षक,गडचिरोली – पोलीस अधीक्षक, कोल्हापूर
6 एम. रमेश अपर पोलीस अधीक्षक, गडचिरोली – पोलीस अधीक्षक,गडचिरोली
7 महेश्वर रेड्डी पोलीस अधीक्षक, जळगाव – पोलीस अधीक्षक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे
8 श्रीकांत ढिवरे पोलीस अधीक्षक, धुळे – पोलीस अधीक्षक, जळगाव
9 राजकुमार शिंदे, पोलीस उप आयुक्त -पुणे पोलीस अधीक्षक, वाशिम

Exit mobile version