राजकारणात वर-खाली होतं असतं, पण एक निवडणूक झाली म्हणून मी थांबणार नसून कोल्हापूरच्या प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचा माझा अजेंडा असल्याचं प्रत्युत्तर काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी माजी आमदार महादेवराव महाडिकांना दिलं आहे. दरम्यान, छत्रपती राजाराम साखर कारखाना निवडणुकीत मिळालेल्या दणदणीत विजयानंतर महाडिकांनी सतेज पाटलांवर शड्डू ठोकला होता. त्यावर आता सतेज पाटील यांनी पत्रकार परिषद घेत उत्तर दिलंय.
वर्षभरात मोडला मिया खलिफाचा दुसरा संसार
सतेज पाटील म्हणाले, वाढीव सभासदांमुळेच हा निकाल हाती आला असून निकालचं आम्ही आत्मचिंतन करु. निवडणूकीत संघर्ष हा असतोच. जे सभासद 2 हजारांपेक्षा वाढीव होते ते उस उत्पादक नव्हते मतासाठी होते त्याचा फायदा विरोधी आघाडीच्या पॅनलला झाला असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे.
सुरुवात त्यांच्या बाजूने झाली शेवटी राजकारणात उत्तराला प्रत्युत्तर नाही दिलं तर लोकांमध्ये संभ्रण निर्माण होतो. मात्र, या निवडणुकीची पातळी खाली गेली आहे. ती कोल्हापूरच्या दृष्टीने दुर्देवी असून ही निवडणूक वेगळ्या वळणाला गेली असल्याचंही ते म्हणाले आहेत.
फडणवीस भावी मुख्यमंत्री ! बॅनर झळकल्यानंतर फडणवीस म्हणाले, अतिउत्साही लोकांनी..
या निवडणुकीत पैशांचा वापर झाला की नाही तेच सांगू शकतात. कारण निवडणूक जिंकण्याच्या दृष्टीने त्यांनी प्रयत्न केला आहे.
निवडणुकीत हारजीत होत असते ही वेळ अशीच राहते, असं नाही. तसेच खोटे आधार कार्ड तयार करुन मतदान झालं ते दुर्देवी आहे. याबाबत मी निवडणूक आयोगाकडे दाद मागणार आहे.
मुख्यमंत्री सुट्टीवर! प्रश्न विचारातचं अजितदादा भडकले, म्हणाले “नॉट रिचेबल माझ्यापुरतं…”
पट्टणकोटवलीला 12 मतदार खोटे होते. त्यासोबतच 200 ते 250 मतदार खोटे आधार कार्ड असणारे होते ते मागे गेले. सर्वच निवडणुकीत आधार कार्डाचं अॅप अधिकाऱ्यांकडे पाहिजे, अशी निवडणूक आयोगाकडे मागणी करणार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलंय.
दरम्यान, विरोधी पॅनलने जाहीरनाम्यात सांगितल्याप्रमाणे इथेनॉल प्लॅंटची अंमलबजावणी करावी, हीच मागणी असून ज्या मतदारांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी झटणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली आहे.