मोठी बातमी; सतीश वाघोलेंकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार

Satish Waghole takes additional charge as MPSC chairman; सतीश बबन वाघोले यांच्याकडे MPSC अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

Satish Waghole takes additional charge as MPSC chairman

Satish Waghole takes additional charge as MPSC chairman

Satish Waghole takes additional charge as MPSC chairman: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) परीक्षांमधील पेपरफुटी आणि कथित गैरप्रकारांवरून पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते. आयोगाचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी सलग 10 दिवस आंदोलन सुरू ठेवले होते. राज्य सरकारने चौकशी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आणि विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. आता भीमनवार यांच्या रजेच्या काळात आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आले आहेत.

मोठी बातमी! दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; ‘लेहरा दो तिरंगा’ रॅलीपूर्वी अभिजीत दिपकेला घेतलं ताब्यात

पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत अन्न व औषध प्रशासनातील औषध निरीक्षक पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेचा पेपर फुटल्याचे समोर आल्यानंतर प्रकरणाची चौकशी सुरू झाली. या प्रकरणात आयोगातील काही अधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आयोगाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित करत अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

जयंत पाटलांशी वाद, पडळकरांचा अर्ज बाद, सांगली जिल्हा बँक निवडणुकीचा सर्वोच्च न्यायालयात युक्तीवाद

या मागणीसाठी पुण्यात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. आंदोलन मागे घेण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. आयोगातील गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या प्रकरणांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याचे आश्वासन सरकारने दिले. त्यानंतर विवेक भीमनवार यांनी रजेवर जाण्याचा निर्णय घेतला आणि विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले.

सतीश वाघोलेंकडे अध्यक्षपदाची जबाबदारी

विवेक भीमनवार रजेवर असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य सतीश बबन वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या वतीने याबाबतचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

भारतीय कंपनीची मोठी झेप! अंतराळात उभारणार ‘पेट्रोल पंप’; कसा होणार व्यवहार?

सतीश वाघोले सप्टेंबर 2026 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सदस्य म्हणून रुजू झाले होते. 7 सप्टेंबर रोजी तत्कालीन अध्यक्ष विवेक भीमनवार यांनीच त्यांना सदस्यपदाची गोपनीयतेची शपथ दिली होती. आता अवघ्या महिनाभरात बदललेल्या परिस्थितीत वाघोले यांच्याकडे अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे.

पेपरफुटी आणि गैरप्रकारांच्या चौकशीसाठी आयोगाची स्थापना

विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान राज्य सरकारने महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील कथित गैरप्रकार आणि पेपरफुटीच्या घटनांची चौकशी करण्यासाठी आयोग स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार सरकारकडून चौकशी आयोगाची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.

या चौकशी आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती दिलीप भोसले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवृत्त न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांच्यासह तुकाराम मुंढे, गणेश पाटील आणि लखामी गौतम यांचाही आयोगात समावेश आहे. या आयोगामार्फत MPSC मधील पेपरफुटी आणि इतर कथित गैरप्रकारांची चौकशी केली जाणार आहे.

पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा; हेक्टरी एक लाख रुपये द्या, खासदार निलेश लंके यांची मागणी

विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर आयोगाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार दुसऱ्या सदस्याकडे सोपवण्यात आला असून, आता चौकशी आयोगाच्या कामकाजाकडे आणि त्यातून समोर येणाऱ्या निष्कर्षांकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version