मुंबई : इथे लाचारांचा नाही विचारांचा मान, भगवे आमचे रक्त आणि प्राण आमचे श्रीराम असे म्हणत शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्कें यांनी राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या. आम्ही दाखवलेलं हिंदुत्व हे बाळासाहेबांचं हिंदुत्व आहे. तेच खरं हिंदुत्व आहे. आम्ही दाखवण्याकरता हिंदुत्व म्हणत नाही. उद्धव ठाकरेचं नाव न घेता म्हस्के म्हणाले काही लोकांनी सत्तेसाठी, खुर्चीसाठी लाचारी पत्करली आहे. जे लोक कायम हिंदुत्वाच्या विरोधात होते. मग ते काँग्रेस असेल राष्ट्रवादी कांग्रेस असेल अशा लोकांना सोबत गेले आहे. आणि त्यांनी हिंदुत्वाचा खून केला आहे. त्यांना हिंदुत्वाबाबत बोलण्याचा काही अधिकार नाही. असा टोला म्हसकेंनी उद्धव ठाकरेंना लगावला.
आम्ही राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांनी जो धनुष्यबाण उचलला आहे तो जर कुणाला लागला असेल तर त्याला आम्ही काही करू शकत नाही. सावरकरांबाबत बोलताना ते म्हणाले स्वातंत्रवीर सावरकरांनी खडतर कष्ट घेतले, देशाला स्वातंत्र मिळून देण्यासाठी त्यांनी बंदिवास भोगला, अतोनात कष्ट त्यांनी घेतले. परंतु काँगेस आणि राहुल गांधीनी त्यांना कायम माफीवीर म्हटले. कायम त्यांच्यावर टीका केली.
Girish Bapat यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार?
ज्यावेळी मणिशंकर अय्यर यांनी सावरकरांवर टीका केली होती त्यावेळी बाळासाहेब ठाकरे रस्त्यावर उतरले होते आणि अय्यर त्यांच्या प्रतिमेला जोड्याने मारले होते. मग आता राहुल गांधींनी टीका केल्याच्यावर बाळासाहेबांचा वारसा सांगणारे काय करतात फक्त त्यांना मीटिंग मध्ये सांगत आहेत. यांनी आता रस्त्यावर उतरले पाहिजे राहुल गांधींना जोड्याने मारले पाहिजे परंतु हे या उलट राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सहभागी होऊन गांधींच्या गळ्यातगळे घालून फिरत आहेत. कुठे गेले बाळासाहेबांचे विचार, शरम वाटली पाहिजे आज अशी कृती करताना अशा शब्दात नरेश म्हस्केनी उद्धव ठाकरेंवरती टीका केली.