Girish Bapat यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेची पोटनिवडणूक होणार?
पुणे : भाजपचे पुणे लोकसभा मतदारसंघाचे खासदार आणि ज्येष्ठ नेते गिरीश बापट (Girish Bapat ) यांचे निधन झाले. वयाच्या ७२ व्या वर्षी बापट यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर राजकीय वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे. अशातच पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर लोकसभेची पोटनिवडणूक (bypoll election) होऊ शकेल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
गिरीश बापट यांचे पार्थिव त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. सायंकाळी ७ वाजता वैंकुठ स्मशानभुमीत गिरीश बापट यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहे. लोकसभा पोटनिवडणुक लागण्याच्या चर्चेवर कायदेतज्ज्ञ उल्हास बापट यांनी महत्वाची माहिती दिली आहे, पुण्यात खासदारकीच्या रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागू शकते. 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार पुण्यात पुन्हा एकदा पोटनिवडणुक होण्याची शक्यता आहे.
Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे…
उल्हास बापट नेमक काय म्हणाले ?
]१९५१ सालचा 151 A लोकप्रतिनिधी कायद्यानुसार जर १ वर्षाची मुदत राहिली असेल तर निवडणुक घ्यावी लागणार आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मे एप्रिल मध्ये होत आहे. सध्या मार्च चालू असल्याने १ वर्षावरुन अधिक काळ आहे. यामुळे ही निवडणुक घ्यावी लागणार आहे आणि ही निवडणुक ६ महिन्याच्या आत घ्यावी लागणार आहे. अशी माहिती कायदेतज्ज्ञ उल्हास बापटांनी दिली आहे. विधानसभेची निवडणुकीसारखीच लोकसभेचीही निवडणुक होणार आहे. दोन्ही नियमात कोणताही फरक नाही. लोकसभा निवडणूक एप्रिल, मे २०२४ मध्ये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सून स्वरदा केळकर नाव चर्चेत ?
बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेली जागा सून स्वरदा केळकर लढवणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सध्या रंगत आहे. संजय काकडे, अनिल शिरोळे, मुरलीधर मोहळ यांची नावं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेत आहेत.