Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे…

Devendra Fadanvis यांना अश्रू अनावर : गिरीशभाऊ आमच्यासाठी जेवण बनवायचे…

पुणे : पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचा आणि माझा अत्यंत जिवाळ्याचे संबंध होते. गिरीश बापट यांचा हजरजबाबीपणा, सर्व पक्षांत समन्वय, कोणताही बाका प्रसंग आला तरी त्यातून मार्ग कसा काढायचा, यामध्ये ते तरबेज होते. पक्षनिष्ठ, पण पक्षापलिकडे जिव्हाळ्याचे संबंध जोपासणारे, सातत्याने जमिनीशी नाळ ठेवणारे बापट हे नेते होते. १५-२० वर्षांपूर्वी आम्ही जेव्हा मुंबईतील मजेस्टिक या आमदार निवासात राहायचो. तेव्हा गिरीशभाऊ हे आमच्यासाठी जेवण बनवायचे, अशी आठवण सांगताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले.

पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचे बुधवारी दुपारी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानंतर श्रद्धांजली वाहत असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अश्रू अनावर झाले.

पुण्याचा, महाराष्ट्राचा विकास हरपला… Narendra Modi यांच्याकडून बापटांना श्रद्धांजली! – Letsupp

पुण्याचे भाजपचे खासदार गिरीश बापट यांचे निधन मनाला चटका लावून जाणारे आहे. राजकारणातील एक सर्व समावेशक नेतृत्व हरपले आहे, असे वाटते. दुर्धर आजाराशी झुंज देत असताना कसबा पोटनिवडणुकीत देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देत होते, हे मी अनुभवले आहे. आमची भेट व्हायची तेव्हा राजकारणाबरोबरच इतर अनेक विषयांवरची त्यांच्याकडची माहिती पाहून मी चकित व्हायचो. काही दिवसांपूर्वी मी त्यांची पुण्यात घरी जाऊन भेट घेतली होती, असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रद्धांजली वाहिली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते, पुण्याचे खासदार गिरीशभाऊ यांच्या निधनाने जमिनीशी नाळ असलेले उत्तुंग व्यक्तिमत्त्व आपल्यातून निघून गेले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खरंतर ते या दुर्धर आजारातून ते बरे होतील, असे वाटत होते. विकास हाच त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता. आजारी असताना सुद्धा सातत्याने मतदारसंघावर त्यांचे लक्ष होते. तसेच त्यांच्याकडे अमरावती जिल्ह्यात शेती होती. त्याकडे त्यांचे विशेष लक्ष होते. त्यांच्या जाण्याने भाजपचे खूप मोठे नुकसान झाले आहे, असे सांगत देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धाजंली वाहिली.

(234) Sushma Andhare : सुषमा अंधारे यांची स्फोटक मुलाखत | LetsUpp Marathi – YouTube

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • twitter
  • youtube