मुंढे पुन्हा कुणाला खटकले?, प्रशासकीय सेवेतील 24 वा बदली आदेश निघाला

मुंढे यांच्या २० वर्षांच्या प्रशासकीय सेवेच्या काळात २४ व्या बदलीचा आदेश त्यांच्या हाती आता आला आहे.

News Photo   2026 03 31T162528.440

मुंढे पुन्हा कुणाला खटकले?, प्रशासकीय सेवेतील 24 व्या बदली आदेश निघाला

रोज अधिकाऱ्यांनी लाच घेतली किंवा कुणाच्या दबावात काम केलं अशा बातम्या येत असताना कायम धडाडीचे (Mundhe) अधिकारी म्हणून ओळखले जाणारे अधिकारी तुकाराम मुंढे यांची बातमी येते ती कायम बदली संदर्भातील. आताही त्यांची बदली करण्यात आली आहे. शिस्तबद्ध स्वभाव आणि कडक शिस्तीमुळे तुकाराम मुंढे नेहमीच चर्चेत असतात ते एकतर त्यांच्या धडाकेबाज निर्णयांमुळं किंवा त्यांच्या बदलीमुळे. मुंढे यांच्या २० वर्षांच्या प्रशासकीय सेवेच्या काळात २४ व्या बदलीचा आदेश त्यांच्या हाती आता आला आहे. दरम्यान, त्यांनी बोगस दिव्यांग शोध मोहीम अधिक तीव्र केली होती. त्याला यश येण्यापूर्वीच मुंढे यांची तेथून बदली करण्यात आली आहे.

मुंढे सध्या असंघटीत कामगार आयुक्त पदावर होते. या पदावरून दिव्यांग कल्याण विभागाच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मंगळवारी सायंकाळी राज्यातील अनेक सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. कार्यक्षम अधिकाऱ्यांसाठी या नियुक्तीला दुय्यम मानलं जातं. तुकाराम मुंढे हे २००५ च्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकारी आहेत. मूळचे बीडचे असलेले तुकाराम मुंढे हे त्यांच्या कडक शिस्तीमुळे ओळखले जातात. त्यांच्या प्रशासकीय सेवेची सुरुवात सोलापुरातून झाली

तुकाराम मुंढेंची तंबी : ‘दिशा अभ्यासक्रमा’ची सक्ती, अन्यथा शाळांचे अनुदान बंद !

पुढच्या काळात मुंढे आदिवासी भागांत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी काम केले. तेथून नांदेडला सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले. एका शाळेला भेट दिल्यानंतर तेथील गैरहजर असलेल्या शिक्षकांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली. या कारवाईने मुंढे यांना राज्यात ओळख मिळाली. शिक्षकांवरील निलंबनाच्या कारवाईने ते प्रकाशझोतात आले. त्यांच्या कारवाईने शिक्षकाच्या गैरहजेरीचे १०-१२ टक्क्यांचे प्रमाण कमी होऊन १ ते २ टक्क्यांवर आले. राज्य सरकारने देखील त्यांच्या कामाची दखल घेतली. तेथून ते सेवेसाठी नागपूरला गेले.

नागपूरवरून ते नाशिकला अतिरिक्त आदिवासी आयुक्त म्हणून रूजू झाले. आदिवासी विभागात काम करताना त्यांनी खूप चांगले निर्णय घेतला, ज्याचा फायदा लाखो आदिवासींना झाला. पुढे मुंबईला खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही काम केले. तेथून त्यांची जालन्याला जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. पुढे सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाल्यानंतर त्यांनी आषाढी वारीचे योग्य नियोजन करताना वारकऱ्यांच्या नदीत प्रात:विधी करण्याने नदीचे प्रदुषण होत असल्याने त्यांनी काही दिवसांत तीन हजार शौचालय उभारले, त्यांच्या या निर्णयाचा अनेक वारकऱ्यांना थेट फायदा झाला.

कोणकोणत्या अधिकाऱ्यांची झाली बदली?

तुकाराम मुंढे (भाप्रसे) यांची – प्रधान सचिव, आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन , महसूल वन विभाग येथे बदली झाली आहे.

विनीत वैद्य सिंगल (भाप्रसे) – यांची प्रधान सचिव , मृद आणि जलसंधरण विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.

लोकेश चंद्रा (भाप्रसे) यांची – मुख्यमंत्री यांचे अप्पर मुख्य सचिव मंत्रालय, मुंबई येथे बदली झाली आहे.

लहू माळी (भाप्रसे) यांची- व्यवस्थापकीय संचालक, शिवशाही पुनर्वसन प्रकल्प मर्यादित येथे बदली झाली आहे.

परिमल सिंह (भाप्रसे) यांची – सचिव (कृषी), कृषी आणि पदुम विभाग, मंत्रालय येथे बदली झाली आहे.

विकास चंद्र रस्तोगी (भाप्रसे) यांची- अप्पर मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा), वित्त विभाग मंत्रालय येथे बदली झाली आहे.

माणिक गुरसाळ (भाप्रसे) यांची – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय मुंबई येथे बदली झाली आहे.

पृथ्वीराज बी. पी (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त वसई विरार महानगरपालिका येथे बदली झाली आहे.

आश्विनी भिडे (भाप्रसे) यांची- महापालिका आयुक्त, बृहन्मुंबई महानगरपालिका येथे बदली झाली आहे.

प्रेरणा देशभ्रतार (भाप्रसे) यांची- आयुक्त, मत्य्यव्यवसाय मुंबई येथे बदली झाली आहे.

Exit mobile version