Download App

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर

गाडगीळ मागील अनेक दशके संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून लोक आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम

  • Written By: Last Updated:

Environmentalist Madhav Gadgil Champion of Earth Award : ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांना संयुक्त राष्ट्रांची पर्यावरण संस्था असलेल्या (UNEP)चा ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. UNEP च्या ‘चॅम्पियन ऑफ अर्थ’ पुरस्कारानं अशा व्यक्ती आणि संस्थांना सन्मानित केलं जातं, ज्यांनी पर्यावरणाचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी केलेल्या (Madhav Gadgil ) कामानं मोठा प्रभाव पडला आहे. २००५ पासून या पुरस्काराने आतापर्यंत १२२ संशोधकांना गौरविण्यात आलं आहे.

Bhumi Pednekar: पर्यावरण जागृतीसाठी अभिनेत्रीने सुरू केली,भूमी नमस्कार मोहिम

गाडगीळ मागील अनेक दशके संशोधन आणि सामुदायिक सहभागाच्या माध्यमातून लोक आणि पर्यावरणाचं संरक्षण करण्याचं काम करत आहेत. डॉ. गाडगीळ यांना यापूर्वी ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ हे भारताचे मानाचे पुरस्कार मिळाले असून, जगातील अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलx आहे. वयाच्या ८२ व्या वर्षी देखील ते कार्यरत आहेत.

गाडगीळ यांनी पश्चिम घाटात अनेक वर्षे संशोधन करून एक अहवाल तयार केला होता. पश्चिम घाटातील पर्यावरणाचा प्रकल्पांमुळे होणारा ऱ्हास त्यांनी या अहवालात मांडला आहे. डॉ. गाडगीळ यांनी आतापर्यंत ७ पुस्तके लिहिली असून, २२५ वैज्ञानिक संशोधनपर लेख आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

मी लोकांसमवेत काम केलं

जे काही बरोबर आहे, त्याविरुद्ध लिखाण केल्यामुळे मी आनंदी आहे. मी एक शास्त्रज्ञ असून, लोकांसमवेत काम केले. अन्यथा इतर शास्त्रज्ञ असे काम करत नाहीत. ते राजकारणी लोकांच्या दबावाखाली वस्तुनिष्ठ व स्पष्ट असे काम करायला घाबरतात. परंतु, मी गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे काम करतोय. त्यामुळे मी समाधानी आहे आणि हा पुरस्कार मिळाल्याने खूप आनंद झाला, अशी प्रतिक्रिया गाडगीळ यांनी दिली आहे.

follow us

संबंधित बातम्या