Shripad Mirikar Sad Demise :: महाराष्ट्रातील एक ज्येष्ठ अभ्यासू पत्रकार श्रीपाद मिरीकर यांचे निधन झाले आहे. स्नेहालयसह अनेक सामाजिक संस्थेचे ते आजीव सदस्य आणि पालक श्रीपाद रामराव तथा अण्णा मिरीकर यांचे आज मंगळवारी १०.३० वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, तीन विवाहित मुले, नातवंडे असा परिवार आहे.
मिरी येथील सरदार घराण्यातील वंशज मिरीकर यांनी तब्बल ४५ वर्ष पत्रकारिता केली. नगर शहराचा इतिहास ,संस्कृती, अध्यात्म साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या विषयातील ते जाणकार लेखक आणि अभ्यासक होते.
Karnataka Election : गुजरातच्या फॉर्म्युल्याची भाजप विशेष सुपर ५० टीम उतरवणार – Letsupp
आरंभी दैनिक समाचार आणि नंतर तीन दशके दैनिक सकाळमध्ये, अशी तब्बल ४५ वर्ष त्यांनी विकास पत्रकारिता केली. नगर शहर आणि जिल्ह्याच्या इतिहास, संस्कृती, अध्यात्म, साहित्य, शिक्षण आणि समाजसेवा या विषयातील ते जाणकार लेखक आणि अभ्यासक होते.
अहमदनगर जिल्हा ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, स्नेहालय, अहमदनगर शहर आणि जिल्हा पत्रकार संघ, आदी सामाजिक संस्थांचे अण्णा आधारस्तंभ होते. उद्या सकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार असल्याचे मिरीकर कुटुंबाचे निकटवर्ती अभिजीत क्षीरसागर यांनी सांगितले.
(13) Devendra Fadanvis | ‘काय होतास तू काय झालास तू…’LetsUpp Marathi – YouTube