Pannalal Surana Passed Away : मोठी बातमी! जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन

Pannalal Surana Passed Away : जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

Pannalal Surana Passed Away

Pannalal Surana Passed Away

Pannalal Surana Passed Away : जेष्ठ समाजवादी विचारवंत पन्नालाल सुराणा यांचे निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 93 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. सध्या समोर आलेल्या माहितीनुसार, नळदुर्ग येथील अपना घर येथे काल रात्री जेवणानंतर त्यांना उलटीचा त्रास झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवल्याची असल्याची माहिती माध्यमांशी बोलताना डॉक्टरांनी दिली. तर दुसरीकडे पन्नालाल सुराणा यांच्या निधणानंतर त्यांच्या पार्थिववर शासकीय रुग्णालयात देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आले आहे.

पन्नालाल सुराणा (Pannalal Surana) यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील बार्शीत 9 जुलै 1933 रोजी झाला होता. शाळेत असताना पन्नालाल सुराणा राष्ट्रसेवा दलात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी जयप्रकाश नारायण यांच्यासोबत बिहारमध्ये भूदान चळवळीत भाग घेतला. तसेच त्यांनी समाज प्रबोधन संस्थेचे सचिव आणि समाजवादी पक्षाच्या राज्या शाखेचे सचिव म्हणून देखील काम बघितले. तर शिक्षणपूर्ण झाल्यानंतर त्यांनी पत्रकारिता क्षेत्रात प्रवेश केला. मराठवाडा दैनिकाचे त्यांनी संपादक म्हणून काम पाहायला त्यांनी यादरम्यान शेती, बेरोजगारी आणि शिक्षण या विषयावर जास्त लेखन केले आहे.

निखील वागले यांची पोस्ट

लढवय्या समाजवादी आणि समर्पित समाजसेवक, साथी पन्नालाल सुराणा (93)यांना भावपूर्ण श्रद्धांजली! काही वेळापूर्वी सोलापूरहून आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ अभ्यासक व नेते आणि माझे सन्मित्र दत्ताजी गायकवाड यांनी पन्नालालजी म्हणजेच आपल्या सर्वांचे भाऊ यांच्या निधनाची बातमी कळवली. त्यांनी देहदान केले केले आहे. समाजवादी चळवळीमधला व्यासंगी, आणि समर्पित नेत्याचा जणू आदर्शच असलेला असा हा मोठा माणूस आणि नळदुर्गच्या ‘आपलं घर ‘, मधील निराधार मुलांचा शेवटच्या श्वासापर्यंतचा खराखुरा पालक. आज रात्री दहाच्या सुमारास नळदुर्ग मधील संस्थेतच भाऊंचे निधन झाल्याची माहिती त्यांनी दिली. माझे आणि भाऊंचे संबंध अनेक वर्षांचे होते आणि वृत्तपत्रात काम करताना मला त्यांनी लेखन सहकार्य केले होते.

देवगुरू राशी बदलणार, ‘या’ राशींना होणार फायदा; जाणून घ्या आजचा दिवस कसा राहणार?

मुद्देसूद आणि नेमके सामाजिक, राजकीय संदर्भ देत लिहिणारा हा अभ्यासू नेता होता. मला त्यांचा सहवास लाभला आणि त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळाले. या महान समाजवादी नेत्याला, नेहमीच आपुलकीने आस्थेने बोलणाऱ्या, वागणाऱ्या आपल्या भाऊंना माझी विनम्र आदरांजली!

Exit mobile version