धक्कादायक! बार्शीत शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची गाडी जाळली; रोहित पवारांच्या निशाण्यावर कोण?

धक्कादायक! बार्शीत शरद पवार गटाच्या तालुकाध्यक्षाची गाडी जाळली; रोहित पवारांच्या निशाण्यावर कोण?

Solapur News : सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातून (Solapur News) एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांची चारचाकी पेटवून देण्यात आली. या घटनेने बार्शीत मोठी खळबळ उडाली आहे. ही गाडी कुणी जाळली याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार का? असा सवाल आमदार रोहित पवार यांनी (Rohit Pawar) विचारला आहे. यासंदर्भात आमदार रोहित पवार यांनी या घटनेची माहिती देणारं एक ट्विट केलं आहे. तसेच या प्रकरणी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली आहे.

या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी या घटनेचे व्हिडिओही पोस्ट केले आहेत. ‘जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही,’ ही म्हण बार्शी तालुक्यात तंतोतंत लागू होतेय. विधानसभेत पराभूत झालेले बार्शीचे माजी आमदारपुत्र रणवीर राऊत यांनी केवळ राजकीय द्वेषातून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार’ पक्षाच्या ओबीसी सेलचे बार्शी तालुकाध्यक्ष शांताराम जाधवर यांना शिविगाळ केली. या शिव्या इतक्या घाणेरड्या की तो आवाज शेअरही करू शकत नाही.

Video : खासदार म्हणून एक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी काय केल; मोहिते पाटलांनी यादीच वाचली

या घटनेला महिना उलटत नाही तोच रात्री त्यांची गाडी जाळून टाकण्याचा गंभीर प्रकार घडला. ही गाडी कुणी आणि का जाळली? याचं उत्तर राज्याचं गृहखातं देणार आहे का? जाधवर कुटुंबाची आज गाडी जाळली उद्या घर जाळल्यानंतर आणि घरातील व्यक्तींचा बळी गेल्यानंतर गृहखात्याला जाग येणार आहे का? की पोलीस दुसरा संतोष देशमुख होण्याची वाट पाहात आहेत? उद्या जाधवर कुटुंबाला काही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही सरकार आणि पोलीस प्रशासनाची राहील. मुख्यमंत्री महोदय याकडं गांभीर्याने लक्ष द्या, ही विनंती! असे रोहित पवार यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube