Download App

SET Exam : भावी प्राध्यपकांसाठी आनंदाची बातमी! नेट प्रमाणे सेटही वर्षातून दोनदा होणार

  • Written By: Last Updated:

SET Exam : राज्यामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट (SET Exam) ही परिक्षा घेतली जाते. मात्र ही परिक्षा वर्षातून एकदाच होत असल्याने भावी प्राध्यापकांना वाट पाहावी लागत होती. मात्र आता ज्याप्रमाणे देश पातळीवरील सहाय्यक प्राध्यापक पदासाठीची नेट ही परिक्षा वर्षातून दोनदा होते त्याप्रमाणे सेट ही परिक्षा देखील वर्षातून दोनदा होणार आहे.

नेट प्रमाणे सेटही वर्षातून दोनदा होणार…

याबद्दल विद्यापीठ अनुदान आयोग पुरस्कृत सुकाणू समितीने गठित केलेल्या समितीच्या निर्णयांच्या आधारे हे नवे बदल होणार आहेत. त्याचबरोबर राज्यात सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाणारी सेट ही परिक्षा आतापर्यंत ऑफलाईन घेतली जात होती. मात्र आता ती ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे.

President Draupadi Murmu घेणार शनि दर्शन; ‘या’ दिवशी येणार अहमदनगर दौऱ्यावर

मात्र यंदा होणारी सेट परिक्षा ऑफलाईनच असणार आहे. ही सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे यांच्याकडून घेतली जाणारी शेवटची ऑफलाईन सेट परिक्षा असणार आहे. त्याचे वेळापत्रक पुढील आठवड्यात जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान राज्यात होणाऱ्या इतर ऑनलाईन परिक्षांचा गोंधळ पाहता अद्याप देखील सेट परिक्षा ऑनलाईन घ्यायची की, नाही याचा विचार सुरू आहे.

Mahrashtra Kesari : नेमकी खरी स्पर्धा कोणती? पाहा व्हिडिओ | LetsUpp Marathi

दरम्यान सेट परिक्षा ऑनलाईन घेण्यासाठी परीक्षा केंद्रांची प्रत्यक्ष पाहणी, इंटरनेट बँड विड्थ आणि सुविधांच्या आधारेच ऑनलाईन परीक्षेचा निर्णय घेण्यात येणार आहे. राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये. तसेच परीक्षेच्या वेळी गोंधळ निर्माण होऊ नये. म्हणून आधी प्रत्यक्ष चाचणी करूनच ऑनलाईन सेट परीक्षेचा विचार केला जाणार आहे. त्याचबरोबर ही परीक्षा ऑनलाईन घेण्यासाठी प्रत्यक्ष चाचणीनंतरच अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. त्याचबरोबर निकाल देखील जलद लागावेत, विद्यार्थ्यांना संधी मिळावी. म्हणून ही परीक्षा वर्षातून दोनदा घेण्याचा आमचा विचार असल्याचं सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉक्टर पराग काळकर यांनी सांगितलं.

Tags

follow us