Download App

‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत’…; पहाटेच्या शपथविधीवर शरद पवारांचा मोठा खुलासा

Sharad Pawar On Ajit Pawar Oath with Devendra Fadanvis :   राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या लोक माझे सांगाती या आत्मचरित्राच्या दुसऱ्या भागाचे आज प्रकाशन झाले आहे. या पुस्तकात त्यांनी अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत पहाटे घेतलेल्या शपथ विधीबद्दल भाष्य केले आहे. यावरुन आता राजकीय वर्तुळात चर्चांना वेग आला आहे.

या अगोदर त्यांनी आपल्या आत्मचरित्राचा पहिला भाग लिहला होता. या आत्मचरित्रामध्ये त्यांनी 2015 पासून ते आत्तापर्यंतच्या घटनांचा उल्लेख केला आहे. यात प्रामुख्याने 2019 साली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होत असताना त्या अगोदर अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतली होती, त्यावर भाष्य केले आहे. यावेळी त्यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार होते. या प्रसंगावर शरद पवार यांनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये भाष्य केले आहे.

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

23 नोव्हेंबरच्या सकाळी ६.३० वाजता माझ्या निवासस्थानी फोन खणखणला. अजित पवार यांनी भाजपाला राष्ट्रवादीचा पाठिंबा असल्याचं पत्र सादर केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अजितदादा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत,’ अशी माहिती मला देण्यात आली. तो मोठा धक्का होता. ‘महाविकास आघाडी’चं सरकार बनवण्यासाठी राष्ट्रवादीचा पुढाकार असतानाच हे घडणं, म्हणजे आमच्या सर्वांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह होतं, असे त्यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे.

Important Update Regarding Shreyas Iyer Fitness Has Come Out 2023 05 02T115207.540

 

Sharad Pawar : आज‘लोक माझे सांगाती’चा पार्ट 2 येणार; काय नवे खुलासे समोर येणार? उत्सुकता शिगेला

ते पुढे म्हणतात की,  मी थोडी माहिती घेतल्यावर लक्षात आलं, जेमतेम दहाच आमदार अजितबरोबर गेले आहेत. त्यांच्यापैकीच दोघांशी फोनवर बोलल्यानंतर लक्षात आलं, की हे माझ्या संमतीनंच घडत असल्याची त्यांची समजूत करून देण्यात आली होती. काही मिनिटांतच मी सावरलो. घडलेलं धक्कादायक तर होतंच, परंतु दिशाभूल करून घडवण्यात आलं होतं. ‘महाविकास आघाडी’चा यशस्वी होऊ घातलेला पट उधळून लावण्यासाठी केंद्र सरकार, राजभवन आणि राज्यातल्या भाजपानं केलेला हा रडीचा डाव होता. यातून राजकीय कंड्या पिकण्याआधी, हा गोंधळ निस्तरणं आवश्यक होतं. मी पहिला फोन उद्धव ठाकरेंना केला आणि राजभवनात पहाटे घडलेल्या नाट्याची त्यांना कल्पना दिली. त्यांना ही माहिती सर्वप्रथम माझ्याकडूनच मिळत होती. ‘अजितनं उचललेलं पाऊल अत्यंत गैर असून, याला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजिबात पाठिंबा नाही,’ असं मी त्यांना निःसंदिग्ध शब्दांत सांगितलं, असे शरद पवारांनी आपल्या आत्मचरित्रात म्हटले आहे.

Tags

follow us