NCP Political Crisis : राष्ट्रवादीतील अजित पवारांच्या बंडानंतर एकीकडे संपूर्ण राजकारण ढवळून निघालेले असताना आता, शरद पवार यांना आणखी एक धक्का बसला आहे. कारण आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आलीय. अजित पवार गटाला 42 आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आलीय तर फक्त 11 आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच बहुमत असल्याचं स्पष्ट झालं आहे. आमदारांच्या बलाबलनंतर शरद पवारांना मोठा धक्का बसला असल्याचं बोललं जातंय. ( Sharad Pawar and Ajit Pawar group claim for Party and Party Symbol to Election Commission)
Election Commission of India has received a petition from Ajit Pawar staking claim to Nationalist Congress Party and party symbol. The commission has also received a caveat from Jayant Patil that they have initiated disqualification process against 9 MLAs: Sources pic.twitter.com/Flqqn0ojph
— ANI (@ANI) July 5, 2023
दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि पक्ष चिन्हाच्या संदर्भात अजित पवार आणि शरद पवार या दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि पक्ष चिन्हावर दावा ठोकला आहे. याचिका दाखल केली आहे. दुसरीकडे शरद पवार गटाच्या जयंत पाटील यांनी अजित पवार यांच्यासह 9 बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई करण्याच्या उद्देशाने याचिका दाखल केली आहे.
Maharashtra Politics : पार्थ पडद्याआड मात्र, धाकटे सुपुत्र जय पवार अजितदादांच्या पाठीशी
त्यामुळे आता शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी पक्षामध्ये देखील कुणाला पक्ष आणि पक्ष चिन्हा मिळणार? या लढाईमध्ये कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर शरद पवारांनी आज झालेल्या सभेमध्ये पक्ष चिन्ह जाणार नाही. असं म्हटलं आहे.
53 आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पत्र लिहिले पण मलाच का व्हिलन केलं?
दुसरीकडे आज अजित पवार आणि शरद पवार हे दोघेही नेत्यांच्या बैठका घेणार पार पडल्या, या बैठकांमधून अजित पवारांनी शरद पवारांवर जोरदार हल्लाबोल केला. तर इकडे शरद पवारांच्या सभेमध्ये पवारांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळेंनी माझा बाप माझ्यापेक्षा तुमच्या कार्यकर्त्यांचा जास्त आहे. माझ्या बापाचा नाद करायचा नाही. अशा शब्दांत पवारांवर हल्लाबोल केला आहे.