53 आमदारांनी भाजपसोबत जाण्यासाठी पत्र लिहिले पण मलाच का व्हिलन केलं?
Maharashtra Political Crisis : एकनाथ शिंदेंनी वेगळी भूमिका घेतल्याचे आम्ही वरिंष्ठाना सांगत होतो. उद्धव ठाकरेंना सांगत होतो की अस्वस्थाता आहे थोडं लक्ष द्या. परंतु घडायचं ते घडलं. त्यावेळी माझ्याच कार्यालयात एक बैठक झाली होती. माझ्यासहीत 53 आमदार आणि विधानपरिषदेच्या 9 आमदारांनी मिळून एक पत्र तयार केलं होतं. त्यावेळी आम्ही वरिष्ठांना विनंती केली की सरकारमध्ये आपण गेलं पाहिजे. त्यावेळी प्रफुल्ल पटेल, अजित पवार, जयंत पाटील यांची कमिटी तयार केली आणि तुम्ही भाजपाच्या वरिष्ठांशी बोला. त्यावेळी भाजपाच्या नेत्यांनी फोनवर बोलण्यास नकार दिला. इंदूरला येण्यास सांगितले, असे अजित पवार यांनी सांगितले.
ते म्हणाले की आपल्या पक्षाच्या वरिष्ठांनी सांगितले की तुम्ही इंदूरला गेलात तर मीडियाला कळेल. तुम्ही फोनवरच बोला. आमची तिकीटं रद्द केली. तोपर्यंत एकनाथ शिंदेंचा शपथविधी झाला नव्हता. भाजपच्या वरिष्ठांनी सांगितले की तुम्ही इथं येणार नसाल तर मी दिल्ली सोडून इंदूरला आलोय. अशा गोष्टी फोनवर बोलता येणार नाहीत. यात एक शब्दाने खोट असेल तर एखाद्या आमदाराने सांगावं. सगळ्यांच्या सह्याचं पत्र माझ्याकडे आहे. प्रत्येक वेळी मलाच का व्हिलन केलं जातंय? माझी काय चूक आहे? असा सवाल अजित पवार यांनी केला.
फुलेंची चेष्टा करणाऱ्यांच्या मांडीला-मांडी लावून बसले, जयंत पाटलांचे भुजबळांवर टीकास्त्र…
यावेळी बोलताना अजितदादांनी अनेक विषयांवर परखडपणे भाष्य करत पवारांचे वय आता 83 झाले असून, आता तरी तुम्ही कधी थांबणार आहात की नाही? आशीर्वाद देणार की नाही? मी कुणाच्या पोटी जन्माला आलो नाही, हा माझा दोष आहे का? असे बोलत साहेबांना थेट इ्शारा दिला आहे. एवढेच नव्हे तर, पहाटेच्या शपथविधीवेळी नेमकं काय झालं होते याबाबत अजितदादांनी अनेक गौप्यस्फोट केले.
बापाच्या अन् आईच्या बाबतीत नाद करायचा नाही; सुप्रिया सुळेंचा इशारा
2004 ला आलेली संधी सोडली नसती तर मी आज 2023 मध्ये सांगतोय आतापर्यंत महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसचाच मुख्यमंत्री असता असे अजित पवारांनी सांगितले. शरद पवार हे आमचे दैवत आहेत, त्यांच्या छत्रछायेत आम्ही काम करायला तयार आहोत, असे अजित पवार यांनी बैठकीत सांगितले. राज्यघटना डोळ्यासमोर ठेऊन आम्ही या सरकारचा भाग झालो आहोत, साहेबांसोबत आहोत पण जे राजकारण सुरू आहे ते पाहून आम्ही हा निर्णय घेतला आहे.