टीकाचं नाही तर, ‘उत्तर’ काय देणार; अजितदादा पेचात, बीडची सभा रद्द होणार?

मुंबई : शरद पवार यांची बीडमध्ये नुकतीच सभा पार पडली. त्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची उत्तर सभा येत्या 27 ऑगस्ट रोजी पोर पडणार होती. मात्र, बीडमधील सभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि अन्य नेत्यांकडून ना अजित पवार यांच्यावर थेट टीका करण्यात आली नाही धनंजय मुंडे यांच्यावर. त्यामुळे जर टीकाचे केली […]

Letsupp Image   2023 08 19T115407.977

Letsupp Image 2023 08 19T115407.977

मुंबई : शरद पवार यांची बीडमध्ये नुकतीच सभा पार पडली. त्यानंतर या सभेला उत्तर देण्यासाठी अजित पवार (Ajit Pawar) यांची उत्तर सभा येत्या 27 ऑगस्ट रोजी पोर पडणार होती. मात्र, बीडमधील सभेत शरद पवार (Sharad Pawar) आणि अन्य नेत्यांकडून ना अजित पवार यांच्यावर थेट टीका करण्यात आली नाही धनंजय मुंडे यांच्यावर. त्यामुळे जर टीकाचे केली नाही तर, उत्तर काय देणार असा पेच अजित पवार आणि त्यांच्या गटासमोर उभा ठाकला आहे. त्यामुळे येत्या 27 ऑगस्ट रोजी बीडमध्ये होणारी अजित पवारांची उत्तर सभा रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.

‘महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिगाडा काम बिगाडा’; काँग्रेस नेत्याचं भन्नाट ट्विट

बीडमधील शरद पवारांच्या सभेत अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या नेत्यांवर टीका केली जाईल असे सर्वांना वाटत होते. मात्र, पवारांच्या बीडमधील भाषणानंतर उत्तर सभा रद्द करावी अशी भूमिका काही नेत्यांनी घेतल्याचे सांगितले जात आहे. शरद पवारांच्या भाषणानंतर अजित पवार गटाची एक बैठक पार पडली.

देवगिरी बंगल्यावर अजित पवार गटातील प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या बैठकीत प्रामुख्याने शरद पवारांच्या आगामी सभांना कसे उत्तर द्यायचे याबाबत चर्चा झाली होती. मात्र, बीडमधील सभेत पवारांनी अजित पवार आणि धनंजय मुंडेंवर प्रत्यक्ष टीका करण्याचे पाहिला मिळालं. त्यामुळे उत्तर सभेत नेमकं काय उत्तर दिलं पाहिजे या संदर्भातील चर्चा होत होती. परंतु, पवारांच्या सभेनंतर उत्तर देण्यासारखे काही विषय नसतील तर, ही सभा का घ्यावी असा सूर काही नेत्यांचा होता. त्यामुळे आता अजित पवारांची बीडमधील उत्तर सभा रद्द होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने अस्वस्थता; फडणवीस, सांभाळा! सामनातून टीकेचे बाण

बीडच्या सभेत काय म्हणाले होते शरद पवार?

बीडमध्ये पार पडलेल्या शरद पवारांच्या सभेत राष्ट्रवादीचे पदाधिकारी, तरुण नेत्यांनी जोरदार भाषणे केली. सर्वांनी शेरोशायरी केली. कृषिमंत्री धनंजय मुंडे यांचा हा जिल्हा बालेकिल्ला असल्याने त्यांच्यावर थेट हल्लाबोल होईल, असे बोलले जात होते. मात्र, शरद पवारांसह राष्ट्रवादीचे नेते, स्थानिक नेत्यांनी धनंजय मुंडे यांच्यावर हल्ला टाळला. त्यांचे नावही भाषणात घेण्यात आले नाही. तर आमदार संदीप क्षीरसागर यांचे मात्र सर्वांनी जोरदार कौतुक केले.

शरद पवार यांनी आपल्या भाषणात एक सहकारी पक्ष सोडून गेला आहे. कालपर्यंत ठीक होता. माझ्याबरोबर भवितव्य नसल्याने दुसरा नेता निवडला पाहिजे असे सांगून ते निघून गेले. माझे वय झाले आहे. तुम्ही माझं काय बघितले आहे, असा टोलाही पवारांनी अमरसिंह पंडित यांना लगावला. सामूदायिक शक्ती उभे केली तर काय होते ? हे या जिल्ह्याने दाखवून दिले आहे. ठीक आहे सत्तेच्या बाजूला तुम्हाला जायचे होते. पण निदान ज्यांच्याकडून आयुष्यात काही घेतले आहे. त्यांच्याबद्दल माणुसकीला ठेवायची होती. आता लोक योग्य प्रकारे धडा दाखविल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा शरद पवार यांनी यावेळी दिला. त्याचबरोबर राज्य सरकार, केंद्र सरकारच्या कारभारावर पवारांनी जोरदार टीका केली, पण शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्यावर मात्र टीका केली नाही.

‘महायुतीचं सरकार म्हणजे तीन तिगाडा काम बिगाडा’; काँग्रेस नेत्याचं भन्नाट ट्विट

आव्हाडांकडून धनंजय मुंडेंच्या नावाचा उल्लेख

एकीकडे शरद पवारांनी थेट अजित पवार किंवा धनंजय मुंडे यांच्यावर थेट टीका करणं जरी टाळलं असलं तरी, राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड भाषणादरम्यान धनंजय मुंडेंचे नाव घेतले. ते राष्ट्रवादीत येण्यासाठी एका वर्षापासून तयार होते. परंतु पवारांनी घेतले नाही. नाईलाजास्तव त्यांना पक्षात घ्यावे लागेल, असे आव्हाड म्हणाले. परंतु त्यांनी मुंडेंवर थेट हल्लाबोल केला नाही. माजी अनिल देशमुख, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह  स्थानिक नेत्यांनीही आपल्या भाषणात धनंजय मुंडेंवर टीका करणे टाळल्याचे पाहिला मिळाले.

Exit mobile version