आमच्यासाठी प्रचंड मोठा धक्का; अजितदादांच्या निधनानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

Sharad Pawar On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं आहे

Sharad Pawar On Ajit Pawar Death

Sharad Pawar On Ajit Pawar Death

Sharad Pawar On Ajit Pawar Death : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आज बारामती येथे झालेल्या एका विमान अपघातात निधन झालं आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामती दौऱ्यावर आज जात असताना विमान लँडिंगपूर्वीच विमानाचा अपघात झाल्याने या अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

अजित पवार यांच्या निधनाची बातमी समोर येताच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली आहे. तर आता शरद पवार यांची देखील प्रतिक्रिया समोर आली आहे. आमच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. जे काही नुकसान झालंय ते भरुन निघणार नाही असं शरद पवार यांनी म्हटलं आहे. माध्यमांना प्रतिक्रिया देताना शरद पवार प्रचंड भावूक झाल्याचं पाहायला मिळाले.

आमच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का: शरद पवार

आमच्यासाठी हा प्रचंड मोठा धक्का आहे. जे काही नुकसान झालंय ते भरुन निघणार नाही. कर्तृत्ववान व्यक्तीला महाराष्ट्र मुकला आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात. हा निव्वळ अपघात आहे. यात राजकारण नाही. यामध्ये राजकारण आणू नये असं आवाहन देखील शरद पवार (Sharad Pawar) यांनी यावेळी केले.

अपघात कसा घडला?

समोर आलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार बारामतीला जात होते मात्र विमानात काही तांत्रिक बिघाड झाल्याने बारामती विमानतळापासून काही अंतरावर अजित पवार यांचा विमान क्रॅश झाला. विमान ज्या भागात कोसळले, तो भाग खोल होता आणि परिसरात झाडं झुडपं आणि उस शेती असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे बचावकार्य करण्यास अडचणी येत होत्या अशी देखील माहिती समोर आली आहे.

अजित पवार विमान अपघात प्रकरणात सुप्रीम कोर्टाच्या देखरेखीत तपास करा, ममता बॅनर्जींची मोठी मागणी

अजितदादांच्या पार्थिवावर उद्या

अंत्यसंस्कार उद्या सकाळी 11 वाजता बारामती येथील विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अजितदादांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Exit mobile version