Download App

सरकारला सत्तेची मस्ती चढली; आंदोलकांवरील लाठीचार्जवरून विरोधकांनी घेरले !

  • Written By: Last Updated:

जालनाः मराठा आरक्षणाची मागणीसाठी बसलेल्या आंदोलकर्त्यांवर पोलिसांची लाठीचार्ज केला आहे. जालना जिल्ह्यात ही घटना घडली आहे. त्यावरून आता विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना घेरण्यास सुरूवात केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारला दोषी धरले आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, रोहित पवारांनी सरकारवर तोफ डागत फडणवीसांना घेरले आहे.

Jalna Maratha Aandolan Video : जालन्यातील आंदोलनाला हिंसक वळण, लाठीचार्च केल्यानं आंदोलकांकडून दगडफेक, दोन बसही पेटवल्या

सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर पोलीसांनी लाठीचार्ज केला.‌ हे अतिशय संतापजनक आहे. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या भुलथापा देऊन भाजपाने मते घेतली. परंतु आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाला केवळ आश्वासने देण्यापलीकडे भाजपाने काहीही केले नाही, ही वस्तुस्थिती आहे.

मराठा, धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याबाबत आमची भूमिका स्पष्ट आहे. परंतु भाजपाने यासंदर्भात सातत्याने संभ्रम वाढविणारी भूमिका घेतली. केंद्र आणि राज्यात एकाच पक्षाचे, विचारांचे सरकार असूनही आरक्षण दिले जात नाही ही खेदाची बाब आहे. मराठा समाजाच्या आंदोलनकर्त्यांवर लाठीहल्ला करुन भाजपा सरकारने समाजाची क्रूर फसवणूक केली आहे. भाजपाने मराठा समाजाची याबद्दल माफी मागितली पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

अजित पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, ‘त्यांना मुंबईचं हित कळत नाही’

आमदार रोहित पवार म्हणाले; मराठा समाजाचे आंदोलन उधळण्यासाठी अमानुषपणे लाठीचार्ज करणाऱ्या राज्य सरकारचा जाहीर निषेध. राज्य सरकारला सत्तेची मस्ती चढली आहे. सत्तेच्या मस्तीतूनच सरकार असा लाठीचार्ज करत आहे. आता या मस्तवाल आणि घमेंडिया सरकारची मस्ती उतरवण्याची वेळ आली असल्याचा इशारा आमदार रोहित पवारांनी दिला आहे.

राज्यातील एखादा समाज शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारच्या समोर ठेवत असताना, त्यांच्यावर असा अमानुष लाठीचार्ज करणे, हे सरकारला शोभत नाही. केंद्रात आणि राज्यात सरकार असताना देखील मराठा बांधवांना,आरक्षण देण्याची हमी देण्याचं सौजन्य सुद्धा हे सरकार दाखवत नाही. उलट त्यांच्यावरच लाठीचार्ज करून या लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत. मराठा समाजावर झालेल्या या अमानुष हल्ल्याचा जाहीर निषेध करतो, असे जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.

Tags

follow us