अजित पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, ‘त्यांना मुंबईचं हित कळत नाही’

अजित पवारांचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल, ‘त्यांना मुंबईचं हित कळत नाही’

Ajit Pawar on Uddhav Thackeray : मुंबईच्या आर्थिक विकासाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारी केंद्र सरकारने नीती आयोगाकडे (NITI Aayog) सोपविली आहे. यावर शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जोरदार टीका केली होती. त्यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

एमएमआर महत्वाचे आहे तसे पुणे, पिंपरी चिंचवड महत्वाचे आहे. उद्या नवीन शहरं घेत असताना पुणे, पिंपरी चिंचवडचा समावेश करावा अशी मी त्यांना विनंती केली. मग आता पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या लोकांना सांगायचं का? जिल्ह्यातून पुणे, पिंपरी-चिंचवड वेगळं करायचा डाव आहे? असा हल्लाबोल अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

अजित पवार म्हणाले की नीती आयोगाच्या टीमसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी आमची नीती आयोगाच्या टीमसोबत आमची मिटींग झाली. काही जण विकासाबद्दल बोलत नाहीत. राज्याचे हित कशात आहे ते पाहायचे नाही. जाती, धर्मामध्ये तेढ निर्माण केला जातोय, अशी हल्लाबोल अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला.

INDIA Alliance : आम्हाला घमेंडी म्हणण्याची वेळ येते म्हणजे भाजपच घमेंडी; पवारांचं टीकास्त्र

विकास करण्यासाठी नीती आयोगाने फक्त चार शहरं निवडली आहेत. मुंबई, सूरत, विशाखापट्टणम आणि वाराणसी या चार शहरांचा समावेश आहे. आता हे म्हणतात मुंबई वेगळी करायची आहे. जोपर्यत चंद्र, सुर्य आहेत तोपर्यंत कोणीच मुंबई वेगळी करु शकत नाही. त्यामुळे काहीपण सांगून लोकांची दिशाभूल केली जाते. त्यांच्या गोष्टीवर विश्वास ठेव नका, अशी टीका अजित पवार यांनी केली.

‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?

आत्तापर्यंत कितीतरी वेळा त्यांनी असे आरोप केले आहेत. ही निव्वळ जनतेची दिशाभूल आहे. तुम्ही विकासावर बोला, देशाचं हित कशात आहे त्यावर बोला, नरेंद्र मोदींच्या निर्णयावर बोला, महायुतीच्या निर्णयावर बोला, आमचे काही चुकत असेल तर ते सांगा. आमचे काही चुकले तर आम्ही दुरुस्त करायला तयार आहेत. त्यांच्या आरोपांना महत्व देण्याची गरज नाही. मुंबई वेगळी करायची म्हणतात मग वाराणसी काय उत्तर प्रदेशातून वेगळी करायची आहे का? गुजरात मधून सूरत वेगळं करायचं आहे का? आंध्र प्रदेशमधून विशाखापट्टणम वेगळं करणार आहेत का? असा सवाल अजित पवार यांनी केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube