‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?

‘पवारांनी थांबवलं पण, ‘ममता’ थांबल्या नाहीत; फडणवीसांनी सांगितलं इंडिया बैठकीत काय घडलं?

Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. या आघाडीकडून पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नावही जाहीर होऊ शकलं नाही. माझा त्यांना सवाल आहे की त्यांनी पंतप्रधान पदाच्या उमेदवाराचं नाव जाहीर करावं, असे आव्हान फडणवीस यांनी दिले. येथे खुर्च्यांची कशी ओढाताण सुरू आहे याचा किस्साही त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांचे उदाहरण देऊन सांगितलं.

‘राज्यात 48 खासदार अन् काँग्रेसला भोपळा’; बावनकुळेंनी सांगितलं विजयाचं भन्नाट गणित

मुंबईतील वरळी येथे महायुतीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. फडणवीस म्हणाले, ममता बॅनर्जी आल्या. सगळ्या नेत्यांना नमस्कार केला. पण त्यांनी खुर्ची देण्यासाठी कुणीच उठलं नाही. शेवटी येथे खुर्ची मिळणार नाही असे दिसताच त्या तेथून निघाल्या. शरद पवार (Sharad Pawar) यांनी त्यांना थांबवायचा प्रयत्न केला. पण त्या काही थांबल्या नाहीत. तसं पवार साहेबांनी अजितदादांनाही थांबवायचा प्रयत्न केला होता. पण, ते सुद्धा थांबले नाहीत.

माझा या 36 पक्षांना प्रश्न आहे त्यांचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण?, आतापर्यंत 5 पक्षांनी दावा ठोकला. ज्याला खरंच पंतप्रधान व्हायचं त्या राहुल गांधींचं नावच घ्यायला कुणीच तयार नाही. आघाडीच्या पत्रकात सांगितलं की शक्यतो एकत्रित लढू. म्हणजे आजच इंडिया आघाडीचे भेंडी आघाडी झाली हे समजा. कारण ते पत्रकात सुद्धा एकत्रित लढू असे म्हणू शकत नाही, अशा शब्दांत फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी इंडिया आघाडीची खिल्ली उडविली.

‘इंडिया’ आघाडीत महत्त्वाचे ठराव, ‘लोकसभा निवडणूक एकत्रित लढणार’

आता आमचा फेव्हिकॉलचा जोड, तुटणार नाहीच

मी बैठकीत काही वेळ बाहेर गेलो होतो. त्याचं स्पष्टीकरण देतो. नेव्ही चीफ आले होते. त्यांना वेळ मागितली होती. ती 3.30 ची होती म्हणून भेटून आलो. विरोधकांकडून विसंवाद निर्माण करण्याचा वाद आहे असे दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पण आपण तीन पक्ष आणि मित्र पक्ष फेव्हिकॉलचा जोड आहे. तो आता तुटणार नाही. त्यामुळे काळजी करू नका. मी, अजितदादा आणि शिंदे यांच्यात पूर्ण संवाद आहे. येथे आल्यावर कोणालाच प्रश्न पडला नाही की आमची जागा कुठे आहे. कारण आम्ही मनाने एकत्र आहोत, असा टोला फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विरोधकांना लगावला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube