Download App

पवारांची शॅडो कॅबिनेट ठेवणार राज्यावर नजर; सरकारच्या 100 दिवसांच्या कामाचा सादर करणार अहवाल

Sharad Pawar यांच्या राष्ट्रवादीकडून सरकारच्या या शंभर दिवसांच्या कामगिरीवर लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली आहे.

  • Written By: Last Updated:

Sharad Pawar NCP Shadow Cabinet will watch on state : राज्यामध्ये महायुतीचे सरकार येऊन दोन महिन्यां होऊन आधीच दिवस होऊन गेले आहेत. सरकारच्या या शंभर दिवसांच्या कामगिरीवर विरोधी पक्ष म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडून लक्ष ठेवण्यासाठी शॅडो कॅबिनेटची निर्मिती करण्यात आली आहे. त्यासाठी शरद पवारांचे राष्ट्रवादीचे मुंबईमध्ये बैठक पार पडली.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये लाजिरवाण्या पराभवानंतर इंग्लंडला आणखी एक धक्का, जोस बटलरने सोडले कर्णधारपद

त्यामध्ये विविध नेत्यांवर संघटनात्मक बांधणीवर चर्चा करून काही जबाबदारी घेण्यात आली आहे. यामध्ये जयप्रकाश दांडेगावकर, शशिकांत शिंदे, जितेंद्र आव्हाड, राजेश टोपे, रोहित पवार, एकनाथ खडसे, हर्षवर्धन पाटील यांच्यावर जिल्ह्यांची जबाबदारी दिली आहे. या जिल्हा नेमून दिलेल्या नेत्यांना महाराष्ट्र पिंजून काढण्याच्या आदेश देण्यात आले आहेत.

मोठी बातमी! स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला पोलीस कोठडी

शरद पवारांनी घेतलेले बैठकीला सर्व आमदार आणि खासदारांची उपस्थिती होती. तसेच शाडो कॅबिनेट मध्ये जास्तीत जास्त तरुण चेहऱ्याला संधी देण्याची रणनीती आखली गेली जिथे पदर रिक्त असतील तिथे पद भरली जाणार आहेत तसेच जिथे पदाधिकारी बदलण्याची गरज असेल तिथे पदाधिकारी बदलले देखील जाणार असल्याचं या बैठकीत ठरवण्यात आला आहे.

ठाकरेंचा कोणता शिलेदार विरोधीपक्ष नेतेपदावर विराजमान होणार? ‘या’ नावांची चर्चा

तसेच या बैठकीमध्ये शरद पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना आणि पदाधिकाऱ्यांना नव्या उमेदीने कामाला लागण्याच्या सूचना दिल्या आहेत तसेच पुढील तीन महिन्यात या शाडो कॅबिनेट करून अहवाल देण्याचे देखील आदेश देण्यात आले आहेत.

follow us