मोठी बातमी! स्वारगेट प्रकरण, आरोपी दत्तात्रय गाडेला पोलीस कोठडी

Dattatray Gade : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकावर एका 26 वर्षीय तरुणीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे (Dattatray Gade) याला काल रात्री पोलिसांनी अटक केली आहे. आज त्याला शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयात (Shivajinagar District Sessions Court) हजर करण्यात आले होते. शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाने दत्तात्रय गाडेला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. पोलिसांनी न्यायालयात आरोपीची 14 दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली होती. तर दुसरीकडे आरोपी दत्तात्रय गाडेच्या वकिलाने तरुणीशी संमतीने शारीरिक संबंध झाल्याचा दावा न्यायालयात केला आहे.
तर आरोपीवर दाखल असलेल्या 6 गुन्ह्यापैकी 5 गुन्ह्यात तक्रारदार महिला आहेत. त्यामुळे त्याचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन काय आहे ते स्पष्ट होते असा युक्तिवाद सरकारी वकिलाने न्यायालयात केला आहे. तसेच या गुन्ह्यामुळे समाजात तीव्र पडसाद उमटले असून आरोपी सराईत असल्याने काही महिलांना विश्वासात घेऊन त्यांच्यासोबत गैरकृत्य केलेले आहे का हे तपसायचे आहे. तसेच या प्रकरणात आणखी काही जणांनी त्याला मदत केली का? याचा तपास पोलिसांना करायचा आहे. असा देखील युक्तिवाद सरकारी वकिलांनी न्यायालयात केला.
प्रकरण काय?
पहाटे 5.30 च्या सुमारास पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात एका 26 वर्षीय तरुणीवर बसमधे अत्याचाराची घटना घडली. पीडित तरुणी पुण्याहून फलटण्याच्या दिशेने जात होती. बससाठी ती स्वारगेट बस स्थानकावर थांबली असता आरोपी दत्तात्रय गाडे तिकडे आला आणि पीडित तरुणीला स्वारगेट आगारात मधोमध उभी असलेली बस फलटणला जाणार आहे असं सांगितलं. उभी असणारी बस सोलापुरला जाणार आहे आणि मधे बस फलटणला थांबणार आहे. असं त्याने पिडितेला सांगितले. यावेळी तो पीडित तरुणीला ताई- ताई म्हणत होता. त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी बस जवळ आली मात्र बस बंद असल्याने तू टॉर्च लावून आतमध्ये जा. हीच बस काही वेळात फलटणला निघेल असं आरोपीने तरुणीला सांगितलं. त्यानंतर तरुणी बसमध्ये चढली आणि तिच्या पाठीमागे बसमध्ये आरोपी दत्तात्रय गाडे देखील चढला आणि बस बंद केली.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 5 महिन्यांत बुडाले 91.13 लाख कोटी, पुढे काय होणार?
त्यानंतर तरुणीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला आणि तिकडून पळ काढला. तरुणी घाबरल्याने तिच्यासोबत घडलेला प्रकार कोणाला सांगितलं नाही. त्यानंतर फलटणला जाण्यासाठी तरुणी दुसऱ्या बसमध्ये बसली आणि तिने हा संपूर्ण प्रकार घरच्यांना सांगितला.