शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 5 महिन्यांत बुडाले 91.13 लाख कोटी, पुढे काय होणार?

  • Written By: Published:
शेअर बाजारात गुंतवणूकदारांना धक्का, 5 महिन्यांत बुडाले 91.13 लाख कोटी, पुढे काय होणार?

Indian Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात (Indian Stock Market) गेल्या पाच ते सहा महिन्यांपासून मोठी घसरण पाहायला मिळत आहे. या घसरणीमुळे गुंतवणूकदारांचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. आज देखील बाजारात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. आज व्यवहाराच्या शेवटच्या दिवशी सेन्सेक्स (Sensex) 1414. 33 अंकांनी घसरला तर निफ्टी (Nifty) 420. 35 अंकांनी घसरुण 22,124.70 वर बंद झाली आहे. त्यामुळे आता बाजारात 28 वर्षांतील सर्वात मोठी घसरण होताना दिसत आहे.

माहितीनुसार, गेल्या पाच महिन्यात भारतीय शेअर बाजारात बीएसईचे मार्केट कॅप (BSE Market Cap) सुमारे 91.13 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. याचा अर्थ असं की, बाजारात गेल्या पाच महिन्यांत 91 लाख कोटी रुपयांची रक्कम बुडाली आहे.

फेब्रुवारी महिन्यात सर्वात जास्त नुकसान

भारतीय शेअर बाजारात ऑक्टोबर महिन्यापासून घसरण होत असली तरही फेब्रुवारी महिन्यात गुंतवणूकदारांना सर्वात मोठा फटका बसला आहे. फेब्रुवारीमध्ये गुंतवणूकदारांचे तब्बल 41 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 31 जानेवारी रोजी बीएसईचे मार्केट कॅप 4,24,02,091.54 लाख कोटी रुपयाचे होते. फेब्रुवारी महिन्यांत 40,80,682.02 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

ऑक्टोबर ते फेब्रुवारीची स्थिती

आकडेवारीनुसार , भारतीय शेअर बाजारात ऑक्टोबरमध्ये बीएसईचे मार्केट कॅप 29,63,707.23 लाख कोटी रुपयांनी घसरले. तर नोव्हेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी सुमारे 1,97,220.44 लाख कोटी रुपयांचा नफा कमावला. तर डिसेंबरमध्ये गुंतवणूकदारांनी 4,73,543.92 लाख कोटी रुपये गमावले. जानेवारीमध्ये गुंतवणूकदारांना 17,93,014.09 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले. तर फेब्रुवारी महिन्यांत 40,80,682.02 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 1996 नंतर पहिल्यांदाच सलग 5 महिने बाजारात घसरण होताना दिसत आहे. त्यामुळे 1996 नंतर मंदी येण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे.

ऑक्टोबरपासून घसरण

भारतीय बाजारात ऑक्टोबर महिन्यापासून शेअर बाजारात सतत घसरण सुरु आहे. आकडेवारीनुसार, सेन्सेक्समध्ये 4,910.72 अंकांची आणि 5.82 टक्क्यांची घसरण झाली आहे. तर निफ्टीमध्ये 1,605.5 म्हणजेच 6.22 ची घसरण दिसून आली. नोव्हेंबर महिन्यात सेन्सेक्समध्ये 0.52 टक्के म्हणजेच 413.73 अंकांची वाढ झाली. दुसरीकडे, निफ्टीमध्ये 0.31 टक्के म्हणजेच 74.25 अंकांची घसरण दिसून आली. तर डिसेंबर महिन्यात सेन्सेक्स 1,663.78 अंकांनी किंवा 2.08 टक्क्यांनी घसरला आणि निफ्टीमध्ये 486.3 अंकांची म्हणजेच 2.01 टक्के घसरण झाली. जानेवारी महिन्यात सेन्सेक्समध्ये 638.44 अंकांनी म्हणजेच 0.82 टक्के आणि निफ्टीमध्ये 136.4 अंकांनी म्हणजेच 0.58 टक्के घसरण झाली आहे.

शेअर बाजार घसरणीचे कारण

ट्रम्प यांच्या शुल्क वाढविण्याच्या निर्णयामुळे बाजारात अनिश्चितता आहे. तसेच ट्रम्प यांच्या टॅरिफ निर्णयानंतर शेअर बाजारातील भावना झपाट्याने घसरल्या आहे. याचबरोबर भारतीय शेअर बाजारात परदेशी गुंतवणूकदारांची मोठी विक्री होत असल्याने देखील शेअर बाजारात घसरण दिसून येत आहे. 5 महिन्यांत परदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय बाजारातून सुमारे 3.11 लाख कोटी रुपये काढून घेतले.

Stock Market Crash : भारतीय शेअर बाजारात ‘ब्लॅक फ्रायडे’, सेन्सेक्स 1414 अंकांनी घसरला

कंपन्यांचे तिमाही निकाल अपेक्षेनुसार नाहीत. तसेच भारतीय बाजारपेठेतून चिनी बाजारपेठेत पैशाचे स्थलांतर. भारतीय बाजारात होत असलेल्या घसरणीमुळे चिनी बाजारपेठेतील गुंतवणूक वाढली आहे, असे बोफा सिक्युरिटीजने म्हटले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube